नागपूर : धंतोली पोलीस ठाण्यात गणेशनगरला एक हॉटेल आहे. तिथं चंद्रशेखर तेलगोटे हे सीआरपीएफचे जवान आहेत. ते काही कामानिमित्त आले होते. गाडी गणेशसागर हॉटेलसमोर पार्क केली. दोन-तीन तासानंतर कामावरून आले. त्यानंतर त्यांना त्यांची गाडी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी चोरीची तक्रार दाखल केली.
त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर जिथून गाडी गेली तिथून ट्रॅप लावण्यात आला. आरोपी नीलेश परिहार हा दुसरी गाडी चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
तपास केल्यानंतर चोरी केल्याची कबुली दिली. शिवाय तिथं ती गाडी नेली ती जागा दाखवली. अटक करून नीलेशचा पीसीआर घेण्यात आला. नीलेश हा सुशिक्षित आहे. एका कंपनीत जॉब करत होता.
दरम्यान त्याला ऑनलाईन जुवा खेळण्याची त्याला सवय लागली. त्यामुळे तो जुन्या गाड्या चोरत असे. १० ते १५ हजार रुपयांत विकत असे. नीलेशने आतापर्यंत जवळपास पाच गाड्या चोरी केल्या आहेत. अजनी, बर्डी या पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
धंतोलीच्या गुन्ह्यातील गाडी मिळाली आहे. गाडी जप्त करण्यात आली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. नीलेशने कंपनीत काम करत असताना चोऱ्या सुरू केल्या. कारण त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते. पण, लवकर श्रीमंत होण्याच्या नादात तो आता जेलही हवा खात आहे. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही कधी ना कधीतरी मिळत असते, हेच यातून दिसून येते.
ऑनलाईन झटपट कमाई करण्याच्या उद्देशाने काही जण याला बळी पडतात. असाचं नीलेश हा ऑनलाईन पैसे कमवण्याच्या नादात लागला. वास्तविकतेचे भान त्याने सोडले. त्यामुळे त्याला आता जेलची हवा खावी लागत आहे.