गडचिरोली : महाराष्ट्राच्या शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा नगरपंचायत इतर स्थानिक पक्ष असलेला आदिवासी विद्यार्थी संघटनेने एकतर्फी बाजू मारली. यात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे दहा, राष्ट्रवादीचे पाच व शिवसेनेचे 2 असे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला 6 नगरपंचायतीत वर्चस्व स्थापन केला. कुरखेडा भाजप पक्षाने एकतर्फी सत्ता हासील केली. घराण्याची नगरी असलेली अहेरी नगरपंचायत त्रिशंकू निकाल लागलेला आहे. अहेरी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मूळ गाव आहे. भाजप पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांच्या मुळगाव अहेरीच आहे. पण हा राष्ट्रवादी किंवा भाजप पक्षाला इथे सत्ता असेल करता आलेली नाही. अहेरी नगरपंचायत पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थी संघटनेने पाच नगरसेवक जिंकून खाता उघडला.
गडचिरोली जिल्ह्यात मागील कार्यकाळात शिवसेनेचे फक्त एक नगरसेवक होते. पण आता पक्षावर निवडून आलेले 14 नगरसेवक बंडखोरी केलेले चार असे मिळून अठरा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेत. राज्याचे नगरविकास मंत्री असलेले गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजनामुळे शिवसेनेला यावेळी थोडाफार फायदा झालेला आहे. राष्ट्रवादी पक्षाला यावेळी व धर्मराव बाबा आत्राम यांना काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. गडचिरोली जिल्ह्यातील सहा नगरपंचायती व महाविकासआघाडी सात सत्ता स्थापन करणार तर सिरोंचा एटापल्ली या दोन तालुक्यात आदिवासी विद्यार्थी संघटना सत्ता स्थापन करण्याचे चित्र दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर काँग्रेस पक्ष ठरला काँग्रेस पक्षाचे बडे नेते व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नियोजनामुळे काँग्रेस पक्षाची दमदार विजयी यावेळी पाहायला मिळाली
कुरखेडा याठिकाणी भाजप पक्ष एकहाती सत्ता हासिल करू शकतो. भामरागड, चामोर्शी, कोरची, धानोरा, मुलचेरा या पाच ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकते. अहेरी येथे कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्याने याठिकाणी एक पक्ष सत्ता स्थापन करणे कठीण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायती निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पहिला पक्ष ठरला आहे. आणि भाजप दुसरा पक्ष तर राष्ट्रवादी पक्षाला तिसरा क्रमांकावर निकाल स्वीकारावा लागला. तर मागील कार्यकाळात शिवसेनेला फक्त एक नगरसेवक होते. यावेळी 18 नगरसेवक गडचिरोली जिल्ह्यात विजयी मिळाविला. स्थानिक पक्ष असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेने 20 नगरसेवक विजयी झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींमध्ये आज मतमोजणी पार पाडली.
एकूण जागा – 153 अंतिम निकाल
काँग्रेस – 39
भाजप – 36
राष्ट्रवादी – 27
शिवसेना -18
आविस – 20
अपक्ष – 13