नागपूर : विधानपरिषद निवडणुकीवरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भारतीय जनता पक्षात कोणताही वाद नाही. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी असं उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी समन्वयातून उमेदवार दिले आहेत. दादा भुसे यांना भेटलो. त्यांचीही नाराजी नाही, असंही बावनकुळे यांनी म्हंटलंय. विधानपरिषदेची निवडणूक आहे. शिंदे गटाची काही नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्यवातून युती झाली आहे. कोकणात उमेदवार जाहीर केला तेव्हा तिथं उदय सामंत होते. त्यामुळं नाराजीचा प्रश्न नाही. शिंदे गट नाराज असल्याच्या बातम्या या कपोलकल्पित आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सोबत प्रचार करणार आहोत. प्रचार-प्रसारामध्ये दोघेही असणार आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस यांच्या युतीमध्ये कुठंही नाराजी नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
नाशिकच्या बैठकीत दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नाशिकच्या जागेचा अजूनही निर्णय व्हायचा आहे. आज किंवा उद्या या जागेचा निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं.
कुठंही नाराजी नाही. दादा भुसे यांच्याशी माझं बोलण झालं आहे. त्यांनी काही नाराजी व्यक्त केली नाही. फक्त लवकरात लवकर उमेदवार द्यावा, असं सर्वांचं म्हणण आहे.
नागपूरची जागा शिक्षक परिषद लढणार आहे. शिक्षण परिषद उमेदवार देते. भाजप त्याला बाहेरून पाठिंबा देते. शिक्षण परिषदेनं उमेदवार दिला आहे. त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणं बाकी आहे. त्यावरही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितंल.
अमरावती आणि नागपूर येथील जागा काँग्रेस महाविकास आघाडीकडून लढण्याच्या तयारीत आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी राज्यातील पाचही जागा लढाव्यात. पाचही जागा एकनाथ शिंदे आणि भाजप मिळून लढत आहोत. महाविकास आघाडीनंही पाचही जागा लढाव्यात, असंही बावनकुळे म्हणाले.