नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्याही चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नका. केंद्र सरकारनं तीन पार्क करायचं ठरविलं आहे. केंद्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये योजना करत असते. सगळ्या राज्यांमधून प्रस्ताव मागविले जातात. पण, एक किंवा दोन राज्यांना प्रकल्प मिळतं. प्रत्येकवेळी महाराष्ट्रातून गेलं, असा कांगावा करणं हे चुकीचं आहे.
यानं राज्याची बदनामी होते. अधिकारी किंवा जे लोकं पाठपुरावा करतात, त्यांचीही बदनामी होते. आपण अर्ज सादर करावा की, नाही. राज्यात तो प्रकल्प आला नाही, राज्यातनं तो पळविला गेला, असा कांगावा केला जातो. कुठलीही माहिती न घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापणं. जुन्या काळातील गेलेल्या प्रकल्पात बदनामी करणं बंद केलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला.
एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं, ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं उदात्तीकरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात गेले. तिथं प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली. तमाशा करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कोणीही कायदा हातात घेतला असता तर हीच कारवाई झाली असती. कुठलीही वेगळी कारवाई झालेली नाही. पण, आपण काहीतरी खूप मोठं केलं आहे, असं दाखविण्याचा हा त्यांचा नाद आहे. या नादातून या सर्व गोष्टी होत आहेत.