Buldhana | मुलगा नाही म्हणून रडत बसू नका; मलकापुरात मुलींनीच दिला वडिलांच्या चितेला मुखाग्नी!

| Updated on: Jan 05, 2022 | 10:48 AM

मला मुलगा नाही, माझ्या मुलीच माझं सर्व करतील, असे विनायक गुरुजी नेहमी म्हणायचे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा तर दिला. एका मुलीने मुखाग्नी दिला.

Buldhana | मुलगा नाही म्हणून रडत बसू नका; मलकापुरात मुलींनीच दिला वडिलांच्या चितेला मुखाग्नी!
मलकापूर येथे अंत्यसंस्कार करतानाचे छायाचित्र.
Follow us on

बुलढाणा : समाजात आजही काही जणांना वारस हवा असतो. मुलगाच हवा असा हट्ट असतो. पण, आता चिंता करू नका. मुलीसुद्धा तुम्हचे पालनपोषण करू शकतात. इतकंच नव्हे, तर अंतीम संस्कार करण्यासाठी त्यासुद्धा अंत्ययात्रेत सामील होतात. त्यामुळं माझ्या मृतदेहाला खांदा कोण देईल, असा प्रश्न विचारून तुम्ही मुलगाच हवा, असा हट्ट सोडून द्या. अशीच एक घटना मुलकापूर शहरात घडली. गुरूजी असलेल्या विनायक पाटील यांच्या मृतदेहाला मुलींनी खांदा दिला. एवढंच नव्हे, तर अंतीम संस्कारही मुलींनीच केला. त्यामुलं गुरुजींच्या या मुलींचं कौतुक होत आहे.

विनायक गुरुजींना नव्हता मुलगा

मलकापूर शहरामधील विनायक पाटील गुरुजी यांचं एक जानेवारीला निधन झालं. पाटील गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांची प्रत्येकांच्या मनात वेगळीच नैतिक ओळख निर्माण झाली होती. मात्र, विनायक गुरुजी यांना मुलगा नव्हता. त्यांच्या मृत्यु पश्च्यात अंतीम संस्कार कोण करेल, असा प्रश्न पडला होता.

मुलींनीच दिला मुखाग्नी

विनायक गुरुजींच्या मुलींनी आपल्या जन्मदात्या पित्याच्या पार्थिवाला खांदा दिलाय. एवढेच नव्हे तर, मुलींनीच मुखाग्नीसुद्धा दिलाय. यावेळी अंत्ययात्रेत सामील नातेवाईक, इष्ट मित्र, मंडळी हे सर्व गहीवरून गेले होते.

गुरुजी म्हणायचे मुलीचं माझं सर्व करतील

मला मुलगा नाही, माझ्या मुलीच माझं सर्व करतील, असे विनायक गुरुजी नेहमी म्हणायचे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा तर दिला. एका मुलीने मुखाग्नी दिला. त्यावेळी उपस्थित नातेवाईक, मित्र परिवारांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. मुलगा नाही म्हणून रडण्यापेक्षा मुलींनाच आपला मुलगा म्हणत जीवन जगावे, असा आदर्श या मुलींनी घालून दिलाय.

Nagpur NMC | पाचशे चौरस फुटाच्या मालमत्तांची करमाफी होणार?; मनपाच्या करसंकलन समितीने घेतला महत्त्वाचा निर्णय 

Nagpur | वाद श्रेय कुणाचे यावरून! खंडाळ्यात सरपंच-आरोग्य कर्मचाऱ्यांत जुंपली; का व्हावं लागलं सरपंचाला गडाआड?

Congress | नागपूर महिला काँग्रेसमध्ये खदखद; 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पक्षासमोर आव्हान?