Inflation : नागपुरात ग्राहकांच्या खिशाला कात्री, भाज्यांच्या दरात दुप्पट वाढ

| Updated on: Aug 07, 2022 | 12:31 PM

नागपूरमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये भाज्यांचे (vegetable) भाव चांगलेच कडाडले आहेत. वाढलेल्या भाज्यांच्या भावामुळे किचन बजेट (Budget) कोलमडलं आहे.

Inflation : नागपुरात ग्राहकांच्या खिशाला कात्री, भाज्यांच्या दरात दुप्पट वाढ
भाज्याचे दर वाढले
Follow us on

नागपूर :  नागपूरमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये भाज्याचे (vegetable) भाव चांगलेच कडाडले आहेत. वाढलेल्या भाज्यांच्या भावामुळे किचन बजेट (Budget) कोलमडलं आहे. पाले भाज्यापासून ते फळभाज्यापर्यंत  सर्वच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चवळीचा भाव 320 रुपयांवर पोहोचला आहे. तर टोमॅटो (tomato) 80 रुपये किलो झाले आहेत. बटाटे, कांदा, लसून, फ्लॉवर, भेंडी, पालक अशा सर्वच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यंदा राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका हा पिकांना बसला. पालेभाज्या आणि फळभाज्यांचे पिक देखील पावसाच्या तडाक्यातून सुटू शकले नाही. अतिवृष्टीमुळे पिक खराब झाले. परिणामी मार्केटमधील भाज्याची आवक कमी झाली. मार्केटमधील आवक कमी झाल्याने भाज्याचे दर गगनाला भिडले आहेत. चवळीच्या भाजीचा भाव प्रति किलो तब्बल 320 रुपये एवढा झाला आहे. चवळीच नाही तर प्रत्येत भाज्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाजीचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचं पहायला मिळत आहे.

भाज्यांची आवक घटली

जून आणि जुलै महिन्यात  राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका विर्दभाला बसला. अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली. त्या्मुळे शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढावले. पावसाचा पालेभाज्या आणि फळभाज्यांना देखील मोठा फटका बसला. नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने भाजीपाला वर्गीय पिके वाहून गेली. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. मात्र मागणीत वाढ झाल्याने भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. नागपुरात भाज्यांच्या दरात जवळपास दुपटीनेच वाढ झाली आहे.  अनेक भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे.

हे सुद्धा वाचा

महागाईचा आलेख वाढताच

दरम्यान महागाईचा प्रश्न हा केवळ भाज्यांच्या भावापूरताच मर्यादीत नाही तर धान्यांच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदीन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तुंचे दर देखील वाढले आहेत. सीएनजी, पीएनजी आणि घरगुती स्वयंपाकाचा गॅस  सिलिंडर एलपीजीच्या दरात  देखील मोठी वाढ झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगने कठीण झाले आहे.