चिचोलीतील डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर व शांतीवन प्रेक्षकांसाठी सज्ज, खुले करण्यास समाजकल्याण आयुक्तांनी सांगितले

| Updated on: Mar 06, 2022 | 6:32 AM

सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर व शांतीवन चिंचोली येथील बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. ही ठिकाणं लवकरच प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात येणार आहेत. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली.

चिचोलीतील डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर व शांतीवन प्रेक्षकांसाठी सज्ज, खुले करण्यास समाजकल्याण आयुक्तांनी सांगितले
समाज कल्याण आयुक्त डॅा. प्रशांत नारनवरे
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत (Department of Social Justice) सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेण्यासंदर्भात नागपूर विकास महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Metropolitan Region Development Authority) येथील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर व शांतीवन चिचोली येथील बांधकामासंदर्भात चर्चा करण्यात आली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता डॉ. लीना उपाध्याय (Superintending Engineer Dr. Leena Upadhyay) यांनी बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटरचे काम पूर्णत्वास येत आहे. एप्रिल-2022 पर्यंत ते प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शांतीवन चिचोली येथील बांधकाम तयार झालेले आहे. सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरात लवकर होणार जनतेसाठी खुले

समाज कल्याण आयुक्त डॅा. प्रशांत नारनवरे शांतीवन चिचोली येथे भेट देवून संस्थेचे पदाधिकारी नागपूर महानगर विकास प्राधिकरण नागपूर यांच्याशी चर्चा केली. तेथे लवकरात लवकर पूर्ण करून जनतेसाठी खुले करून देण्याचे निर्देश दिले. काही अडचण असल्यास शासनाशी पाठपुरावा करण्यात करावा, अशा सूचनाही केल्या. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, तसेच कार्यकारी अभियंता कल्पना ईखार, प्रशांत भांडारकर, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वसतिगृह आदर्श करा

प्रत्येक वसतिगृहाचे एक व्यवस्थापन अहवाल तयार करून ते 15 ते 20 दिवसात आयुक्तालयास सादर करा. समाज कल्याण विभागातील सर्व शासकीय वसतिगृहे हे आतरराष्ट्रीय पातळीवरचे तसेच आदर्श वसतिगृहे म्हणून तयार करायचे आहे, असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बैठकीत सांगितले. नागपूर व अमरावती विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व शासकीय वसतिगृहातील गृहपाल, गृहप्रमुख यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत उपस्थितांना शासकीय वसतिगृहाचा विकास करण्यासंदर्भात सूचना दिल्या. वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थी हा समाजासाठी एक आदर्श म्हणून तयार झाला पाहिजे यांची जबाबदारी तेथील गृहपालावर आहे. गृहपाल हे सामाजिक न्याय विभागातील महत्वाचा घटक आहे. आपल्या वसतिगृहातील सगळे रेकॉर्डस अद्यावत करा. स्टॉक बुक्स, सहा गठ्ठे पद्धतीनुसार सर्व रेकॉर्डस तयार करा. आपल्या वसतिगृहात आदर्श विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे. याकरिता विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींयुक्त योग्य व्यवस्था करा. जेवणासाठी योग्य पद्धतीने व्यवस्था करा. स्वच्छता ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

युक्रेनमध्ये अडकली होती अमरावतीची नेहा, मायदेशी परतल्यावर सांगितला थरारक अनुभव!

आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर गोव्याचे प्रभारी असताना फोन टॅपिंगचा आरोप, आता फडणवीसांचं थेट उत्तर