गडचिरोली : कधी नव्हे ते विदर्भात हत्तींनी दस्तक दिली. एक-दोन नव्हे तर 23 हत्तींचा हा कडप असल्याची माहिती आहे. या हत्तीमुळं गडचिरोलीतील शेतकऱ्यांचं नुकसन होतेय. पण, हत्तींनी अधिवास स्वीकारल्यानं वनविभाग त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. ओडिशातून 23 हत्तींचा कळप गडचिरोलीत दाखल झाला. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या कडपानं चंद्रपूरची सीमा पार केली.
या हत्तीच्या कळतानं शेतपिकांचं नुकसान सुरू केलंय. दक्षिण धानोरा परिक्षेत्रात कन्हारटोला, मुंजारकुंडी, सिसुर या गावालगतच्या हत्तींनी धुमाकूळ घातलाय. नुकसानभरपाई म्हणून वनविभागानं एक लाख रुपये शेतकऱ्यांना दिले. हत्तीमुळे यापुढं नुकसान होऊ नये, म्हणून जिल्हा व पोलीस प्रशासन वनखात्याला सहकार्य करतोय. हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व ड्रोनचा वापर केला जातोय.
ओडिशातल्या हत्तींनी गडचिरोलीचा अधिवास स्वीकारलाय. तो सुरक्षित ठेवण्यासाठी गडचिरोली उपवनसंरक्षकांनी 1 कोटी 40 लाखांचा प्रस्ताव सादर केलाय. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील दरेकसा, राजोली, टिपागड, भामरागड हा हत्तीचा अधिवास म्हणून उपयुक्त ठरू शकतो.
हत्तींच्या हल्ल्यात धानोरा तालुक्यातील कन्हारटोला शेतशिवारात अशोक मडावी हा शेतकरी जखमी झाला. तृणभक्षी प्राण्यांपासून शेतातील पीक वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांसमोर हत्तींचे नवे संकट उभे ठाकले आहे. वनखात्याला हत्तींनाच आवर घालणे खात्याला कठीण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या सीमेत कधी दोन तर कधी तीन हत्ती येत आहेत. पण, कित्तेक वर्षांनंतर 20 च्या वर हत्तींनी विदर्भात शिरकाव केलाय.