नागपूर : जिल्ह्यातील मौदा तालुक्यात सांड नदीला पूर (The river Sand) आला आहे. वाहत्या पाण्यातून प्रवास करू नका, असं आवाहन जिल्हा प्रशासन करते. परंतु, काही लोकं याला जुमानत नाहीत. असाच काहीसा प्रकार मौदा तालुक्यातील तारसा (Tarsa in Mauda taluka) गावाजवळ काल संध्याकाळी उघडकीस आला. काही दिवसांपूर्वी एक स्कार्पिओ पुरात वाहून (drains the Scorpio) गेली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तरीही काही लोकं अतिधाडस करून पुरातून वाहनं काढण्याचा प्रयत्न करतात. पण, असे धाडस जीवावर बेतू शकते. पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहत असेल तर तिथून वाहने नेऊ नका असे आवाहन वारंवार प्रशासन आणि सर्व स्तरातून करण्यात येते. पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहने घेऊन जाणे किती धोकादायक आहे. हे विविध दुर्घटनांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सतत समोर येत असते.
नागपूर जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी या धरणाचे सर्व 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी अर्ध्या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान नदी पूर आलाय. त्यामुळं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात. या पुरामुळं उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आशीनगर झोन, नेहरू नगर, लकडगंज आणि सतरंजीपुरा या चार झोनमध्ये आज पाणीपुरवठा होणार नाहीय. नदीची पाणी पातळी कमी झाल्यावर आणि पम्पिंग मशीनमधील गाळ काढण्यावर पाणी पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
नागपुरात सुरु असलेल्या पावसामुळे पारडी परिसरातील कुंभारपुरा येथील एक घर कोसळले. या अपघातात घरातील एक वृद्ध व्यक्ती जखमी झाली. नागपुरात सुरु असलेल्या पावसामुळे पारडी परिसरातील कुंभारपुरा येथील एक घर कोसळल्याने घरातील एक 80 वर्षीय वृद्ध जखमी झाले. चिंधुजी गिरुले असं जखमी वृद्धाचे नाव आहे. पत् सोबत दोघेच राहतात. मुसळधार पावसामुळे घराची भिंत खचल्याने छही कोसळले. ज्यामुळे घरात असलेले अन्न धान्य वाहून गेले. मूर्ती तयार करण्याचा गिरुले कुटुंबीयाचा व्यवसाय आहे. पुढील आठवड्यात जन्माष्टमी असल्याने मूर्ती तयार करण्याचा कामाला वेग आला होता. परंतु घर कोसळल्याने तयार झालेल्या मूर्ती व मूर्ती तयार करण्याचा साहित्याची नासधूस झाल्याने वृद्ध दाम्पत्यापुढे आजीविकेचे मोठे संकट उभे राहिले आहे.