Nagpur माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल तर, भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

| Updated on: Nov 22, 2021 | 2:03 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातल्या आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयातून भाजपनं रॅली काढली. बावनकुळेंचा अर्ज भरताना भाजपनं चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं.

Nagpur माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल तर, भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे, बाजूला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दुसरीकडं, काँग्रेसच्या देवडिया भवनात भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं शहरातील राजकारण तापलंय.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांची उपस्थिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातल्या आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयातून भाजपनं रॅली काढली. बावनकुळेंचा अर्ज भरताना भाजपनं चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं. भाजपनं माझ्यावर विश्वास दाखविला. त्याबद्दल पक्षाचे आभार मानतो. ही निवडणूक 100 टक्के जिंकणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांना केलाय. तसेच विधिमंडळात जिल्ह्याचे, विदर्भाचे तसेच राज्याचे प्रश्न मांडणार असल्याचं ते म्हणाले.

छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दुसरीकडं, शहरातल्या देवडिया भवनात भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया भवनात आज दुपारी बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. काँग्रेसकडून भोयर यांना विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची तिकीट देण्याची शक्यता आहे.

भोयरांवरील प्रश्नाला भाजप नेत्यांची बगल

छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश का केला, असे विचारले असता त्यावर भाजपच्या नेत्यांनी उत्तर देणं टाळलं. देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. महाराष्ट्राला राष्ट्रीय कार्यकरिणीत स्थान मिळाल्यानं राज्याच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल, असे म्हटले. परंतु, त्यांनी छोटू भोयर यांच्यावर बोलणे टाळले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही छोटू भोयर यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजप नेते छोटू भोयर यांनी का सोडला पक्ष?, पक्षात मोठी खदखद असल्याचा आरोप

गावगुंडाचा हैदोस : पुण्यात ‘फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर केला