नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज लोकमतच्या एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आहेत. या कार्यक्रमात बोलताना केजरीवाल म्हणाले, दिल्ली सरकारनं गरिबांसाठी हॉस्पिटल चांगले बनविले. आधी औषधी मिळत नव्हती. सीटी स्कॅनची मशीन खराब राहत होती. दिल्लीतील सरकारी रुग्णालयांना (Government Hospitals in Delhi) तीन लेवलवर काम सुरू केलं. छोट्या भागासाठी मोहल्ला क्लिनीक (Mohalla Clinics) सुरू केला. याठिकाणी सर्दी, ताप अशा साध्या आजारांवर उपाय केला जातो. दुसऱ्या प्रकारामध्ये पॉलिक्लीनिक सुरू केले. येथे आठ प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर बसतात. इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपचार घेता येतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Specialist Doctors) दिल्ली सरकारनं सुरू केलेत. जे दिल्ली सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही?
दिल्लीत सुमारे दोन कोटी लोकं राहतात. त्या सर्वांचा मोफत उपचार दिल्ली सरकार आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून करते. सुरुवातीला यासाठी त्रास झाला. त्यासाठी फॉलोअप घ्यावा लागला. पण, आता यात सुधारणा झाली. लोकं खासगी मोठ्या रुग्णालयाएवजी सरकारी रुग्णालयात उपचार करून घेतात तेही मोफत, असं केजरीवाल यांनी सांगितलं.
पाच मुलांच्या टीमनं ड्रिंक बनविली. त्यात आयर्न, कॅल्शियम आहे. दहा हजार रुपयांत सहा महिन्यांत अडीच लाख रुपये कमविले. उद्योगपतींनी 17 लाख रुपयांची गुंतवणूक केली. एक गटाने कंपोस्ट बनविला. दहा महिन्यांत 65 हजार रुपये कमविले. हे छोटे व्यवसायिक एकाधी वस्तू तयार करतात. त्याची जाहिरात वेबसाईटवर टाकतात. व्हॉट्सअप गृपवर टाकतात. त्या माध्यमातून ते विक्री करतात. या छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याचं काम दिल्ली सरकार करते.
एका गटानं गेमिंग प्लाटफार्म बनविला. दीड लाख रुपयांचा माल विकला. त्यांच्या व्यवसायातही काही श्रीमंत व्यवसायिकांनी गुंतवणूक केली. हे छोटे व्यवसायिक बिझनेस आयडिया क्रिएट करतात. व्यवसायात बदल घडवून आणतात. आम्हाला पकोडे बनवायचे नाहीत, अशी मिश्कील्लीही केजरीवाल यांनी यावेळी केली.