Nagpur IIM | आयआयएम नागपूरच्या लोकार्पणाप्रसंगी गडकरींनी केले फडणवीसांचे कौतुक; त्यांनी जागा दिली म्हणून सुंदर कॅम्पस उभारलं

| Updated on: May 08, 2022 | 2:43 PM

आयआयएम नागपूरच्या लोकार्पणाप्रसंगी नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. गडकरी म्हणाले, त्यांनी जागा दिली म्हणून सुंदर कॅम्पस उभारलं. त्याशिवाय हे शक्य नव्हतं.

Nagpur IIM | आयआयएम नागपूरच्या लोकार्पणाप्रसंगी गडकरींनी केले फडणवीसांचे कौतुक; त्यांनी जागा दिली म्हणून सुंदर कॅम्पस उभारलं
NITIN GADKARI
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : आयआयएमच्या लोकार्पणाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या आयआयएमच्या कॅम्पसचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. त्यामुळं उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. ही जागा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मिळाली होती. त्यामुळं त्यांच यात मोठं योगदान आहे. राज्य सरकारनेसुद्धा मदत केली. एम्सचे काम एका बाजूने चांगले झाले. मात्र एका बाजूचे जसे व्हायला हवे होते तसे झाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गडकरी यांनी सांगितलं की, नागपूर एज्युकेशन हब तयार होतोय. नागपूर झिरो माईल आहे. चारही दिशेने मध्येभागी असं हे शहर आहे. नागपूरला एज्युकेशन हब, मेडिकल हब (Medical Hub), लॉजेस्टिक हब (Logistics Hub) तयार होतोय. नागपुरात सिम्बॉयसिस कॅम्पस तयार झाले आहे. आयआयएमच्या पहिल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना जॉब मिळाला. त्यांचं 100 टक्के जॉब प्लेसमेंट झालंय.

विदर्भात 350 वाघ

नागपूरच्या आजूबाजूला 350 वाघ आहेत. त्यामुळं टायगर कॅपिटल आहे. नागपूर शहराच्या आजूबाजूला दहा-बारा विश्वविद्यापीठ आहेत. आजचा दिवस आनंदाचा आहे. स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंग बनले आहे. चांगल्या आर्किटेकची निर्मिती झाली. महिंद्राचे अध्यक्ष गुरुनानी हे जागतिक पातळीवर काम करतात. त्यांच्या नेतृत्वात बोर्ड तयार झालं. जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था तयार झाली. आयआयएम नागपूरच्या लोकार्पणाप्रसंगी नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. गडकरी म्हणाले, त्यांनी जागा दिली म्हणून सुंदर कॅम्पस उभारलं. त्याशिवाय हे शक्य नव्हतं.

आयआयएममधील नेतृत्व रिसर्च कामात

मिहानच्या निर्मितीनंतर टाटा, इन्फोसिस आले. एअर बसचे पार्ट तयार करण्यात येणार आहेत. नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस हायवेनं जोडण्यात येणार आहे. आयआयएम हे विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. आता नागपुरात सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत. आयआयएमसोबत इंडस्ट्रीजचा विकास केला जात आहे. पेंच, कान्हा, ताडोबा याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. जागतिक पर्यटक नागपुरात वाघ पाहण्यासाठी येतात. 75 टक्के वन विदर्भात आहे. आयआयएममधील नेतृत्व रिसर्च कामात येईल. नवीन दिशा देईल. धर्मेंद्र प्रधान यांनी यासाठी बरीच मदत केली. मोडेलला स्वीकार केलंय. असं सांगून गडकरी यांनी विद्यार्थ्यांच्या उज्जल भविष्याला शुभकामना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा