नागपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी नागपूरच्या प्रसिद्ध चितार ओळी गणेश मूर्ती बाजारपेठेत मंदीचे चित्र आहे. मू्र्ती कामाचा व्यवसाय निम्म्याने कमी झाल्यामुळे गणेश मूर्तिकार आर्थिक विवंचनेत आहेत. मध्य भारतातील ही सगळ्यात मोठी मूर्तीकारांची बाजारपेठ मानली जाते. कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच सलग दोन वर्षे या बाजारपेठेत उदासीनता दिसून येत आहे. (Ganesh sculptors are still in recession, nagpur’s famous Chitar oli market)
चितार ओळी गणेश मूर्ती बाजारपेठेत लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या मूर्ती बनतात. येथील मूर्तिकार पिढ्यान पिढ्या मूर्तीकामाचा वारसा जोपासत आले आहेत. गणपती उत्सव आला की या बाजारात गणपतीच्या मोठमोठ्या मूर्ती आकार घेताना दिसायच्या. इथल्या मूर्ती इतक्या प्रसिद्ध की संपूर्ण मध्य भारतात या ठिकाणाहून मूर्ती जायच्या. मूर्तिकारांकडे महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यांतूनही गणेश मूर्तीच्या ऑर्डर यायच्या मात्र कोरोना आला आणि बाजारपेठ थंड पडली.
पारंपरिक मूर्तिकार शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांनुसार 4 फूटच्या वर मूर्ती बनवू शकत नाहीत. अनेक मंडळाना कोरोनामुळे परवानगी मिळत नाही त्यामुळे त्यांच्या ऑर्डर अजूनही आल्याच नाहीत. मागच्या वर्षात मोठं नुकसान सहन केल्यानंतर यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी कमीत कमी मूर्ती बनवायला सुरवात केली. मात्र अर्धाही व्यवसाय राहिला नसून आता परंपरा जपणारी नवीन पिढी यापासून दूर जात असल्याचे मूर्तिकार सांगतात.
नागपुरात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच दुसऱ्या लाटेत नागपूर शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. 6 आँगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही. नागपूर शहरात 4 हजार 856 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. (Ganesh sculptors are still in recession, nagpur’s famous Chitar oli market)
Bigg Boss OTT launch LIVE UPDATES : उरलीयत अवघी काहीच मिनिटं, ‘बिग बॉस ओटीटी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!#KaranJohar | #BiggBossOTT | #Voot | #Entertainment https://t.co/JFtM1FbR5E
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
इतर बातम्या
औरंगाबादेत लसीचा मोठा तुटवडा, 45 हजारपेक्षा जास्त नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?