27 लाखांचे मोबाईल चोरले, पळून जात होते नेपाळमध्ये, गँगचा पोलिसांनी केला पाठलाग

| Updated on: Nov 29, 2021 | 12:48 PM

नागपूरच्या धरमपेठ परिसरात वन प्लस मोबाईल शॉपी फोडण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेले वन प्लस कंपनीचे 27 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरी करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास तांत्रिक पद्धतीने सुरू केला.

27 लाखांचे मोबाईल चोरले, पळून जात होते नेपाळमध्ये, गँगचा पोलिसांनी केला पाठलाग
अंबाझरी पोलिसांनी अटक केलेले मोबाईल चोर.
Follow us on

नागपूर : अंबाझरी पोलिसांनी एका आंतरराज्यीय मोबाईल चोर गॅंगला जेरबंद केलंय. नेपाळ सीमेवरून अटक करण्यात अंबाझरी पोलिसांना यश आलंय. ही गॅंग मोबाईल शॉपीमध्ये चोरी करून नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान यासारख्या देशात नेऊन विकायचे.

नागपूरच्या धरमपेठ परिसरात वन प्लस मोबाईल शॉपी फोडण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेले वन प्लस कंपनीचे 27 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरी करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास तांत्रिक पद्धतीने सुरू केला.

पोलिसांनी केला पाठलाग

त्यानंतर पोलिसांना आरोपी इंदोरमध्ये असल्याचं कळलं. मात्र, पोलीस तिथे पोहचेपर्यंत ते बिहारच्या चंपाअरण्यामध्ये पोहचले होते. नेपाळ सीमा लागून असल्यानं त्यांचा नेपाळमध्ये वावर होता. मात्र या टोळीतील दोन जणांना बिहार पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. तोपर्यंत नागपूर पोलीससुद्धा तिथे पोहचली. मोठ्या मेहनतीने त्यांची कस्टडी मिळवली. याचा तपास केला असता ही मोठी गॅंग असल्याचे लक्षात आले. देशाच्या वेगवेगळ्या भागात ही गॅंग महागडे मोबाईल चोरी करते. ते नेपाळ, पाकिस्तान, भूतान, बांगलादेश या देशात जाऊन त्यांची विक्री करतात.

फेसबुक मेसेंजरवरून करतात संपर्क

महत्वाचं म्हणजे ही गॅंग ज्या शहरात चोरी करते त्या शहरातील नेटवर्कचा वापर करत नाही. स्वतःच्या डोंगलच्या माध्यमातून फेसबुक मेसेंजरवरून काँटॅक्ट करतात. त्यामुळं त्यांचे लोकेशन सापडणे कठीण जाते. आता या टोळीतील दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागलेत. बाकिच्यांचा शोध पोलीस घेत असल्याचं अंबाझरीचे पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी सांगितलं.

 

गँगच्या इतर सदस्यांचा शोध सुरू

नागपुरातील मोबाईल शॉपी प्रकरणात याना अटक झाली आहे. परंतु, देशातील वेगवेगळ्या मोठ्या शहरात यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे फरार आहेत. मात्र आता या गॅंगचा शोध पोलीस घेत आहेत.

उद्घाटनाचपूर्वीच कोराडीतील महामार्ग सुरू, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हटविले बॅरिकेट्स, उड्डाणपूल तयार होऊन झाला होता महिना

Video – Nagpur उपलवाडीतील गोदामाला आग, तीन गोदाम जळून खाक