नागपूरः महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी ठराव पास केल्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह त्यांनी विरोधकांचेही अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची सीमाप्रश्नी काय भूमिका आहे हे ही सुरेश खाडे यांनी आज स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी म्हैसाळ योजना आता कशा पद्धतीने अंमलात आणली जाणार आहे त्याचीही माहिती त्यांनी सांगितली.
ज्या सांगलीतील जत तालुक्यामधील 40 गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाला कळवल्यानंतर त्या गावांबरोबर चर्चा करून त्यांना सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
त्यामुळे ज्या कर्नाटकातील 865 गावांनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी संघर्ष केला आहे तरीही त्या गावांना अजून यश आले नाही.
त्यामुळे जत तालुक्यातील ज्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला होता, तो काही एक दोन दिवसामध्ये लगेच मंजूर केला जाणार नाही. आणि कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळच मिळणार असंही नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
जत तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त राहिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पाण्यासाठी वेगवेघगळ्या योजना राबवण्याचं काम जाते आहे. जत तालुक्याला दुष्काळाची मोठी झळ बसत असल्याने 2 हजार कोटीची पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.
त्यामुळे ही गावं कर्नाटकात जाण्याचा तर प्रश्न आता येणार नाही. तरीही दुष्काळ पट्ट्यातील गावांसाठी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यात राबवण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.