राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,…

| Updated on: Mar 07, 2023 | 1:56 PM

टोकाचं जे राजकारण झालंय ते विसरून महाराष्ट्र विकासाने पुढे गेला पाहिजे. आम्ही आज आमच्यापासून ही सुरुवात करत आहोत. सर्वांनी त्याला साथ द्यावी.

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,...
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. गारपिटीने शेतातील पीक नष्ट केले. कांद्याला भाव नाही. शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्या विधान परिषदेमध्ये सरकारला विनंती करेन की, आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं त्यांना मदत मिळावी, यासाठी मी भारतीय जनता पक्षाकडून सरकारला त्यांना मदत संदर्भात विनंती करणार आहे.

सर्वांनी मिळून काम करण्याची गरज

लहानपणापासून माझे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत मी रंगपंचमी साजरी करत असतो. आजचा दिवस हा मनभेद आणि मतभेद बाजूला करून एकत्रितपणे काम करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रातसुद्धा सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी सर्व स्तरावरचे मनभेद दूर करावे. महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


मनभेद, मतभेद विसरून काम करावे

संजय राऊत यांना विनंती करेन की, आजपासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं. अनेकांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात पुढच्या काळात आहे. राजकारणात आमचं कामच पक्ष वाढवणं आहे. संघटन मजबूत करण्याची माझी जबाबदारी आहे. आजच्या दिवशी नाना पटोले आणि इतर सर्व पक्षाचे अध्यक्ष यांनी मनभेद मात्र विसरून महाराष्ट्रासाठी काम करण्याची गरज आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित यावेत

टोकाचं जे राजकारण झालंय ते विसरून महाराष्ट्र विकासाने पुढे गेला पाहिजे. आम्ही आज आमच्यापासून ही सुरुवात करत आहोत. सर्वांनी त्याला साथ द्यावी. महाराष्ट्राची जनता सरकारकडून विकास मागते आहे. तो अपेक्षित विकास आपण सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन जनतेला दिला पाहिजे. असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. विरोधकांना विनंती करेन की, आजपासून मतभेद दूर करू. राज्य विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं कसा जाईल. त्यासाठी प्रयत्न करू. संजय राऊत यांनी मतभेद विसरून राज्याच्या विकासाकरिता काम करावं. असंही त्यांनी सांगितलं.