नागपुरातील स्वयंसेवी संस्थेचा मदतीचा हात, अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोहचविले सुरक्षित ठिकाणी

| Updated on: Mar 04, 2022 | 12:14 PM

सोशल मीडियाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना मदत पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपुरातील स्वयंसेवी संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत अशा 14 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यास मदत मिळाली आहे.

नागपुरातील स्वयंसेवी संस्थेचा मदतीचा हात, अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोहचविले सुरक्षित ठिकाणी
युक्रेनमध्ये सुरक्षित निवारा शोधताना भारतीय नागरिक.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : युक्रेनची राजधानी कीव आणि खारकीव शहरात रशियन सैन्याने अक्षरश धुमाकूळ घातला आहे. प्रमुख शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले होत आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) ही विशेष मोहीम सुरु केली. एकीकडे केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करीत असताना अनेकजण या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. यातच नागपूरची प्लॅटफॉर्म ही स्वयंसेवी संस्था (Platform are NGOs) देखील पुढे सरसावली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून या संस्थेचे सदस्य युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली मदत पोहचविण्याचे काम करीत आहेत. Ngp Students In Ukraine, Help Group for Indians In Ukraine यासारख्या व्हाटसऍप ग्रुपच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत आहे, अशी माहिती वैशाली बोरकर व लुम्बिनी फुलेकर यांनी दिली.

14 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचविले

युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर गंभीर संकट ओढवलंय. युद्धभूमीवर असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी अनेकजण कार्यरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना मदत पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपुरातील स्वयंसेवी संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत अशा 14 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यास मदत मिळाली आहे.

व्हॉट्स ग्रुपच्या माध्यमातून मदत

युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या बिलगोरोड शहरात भारतीय बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र खारकीव आणि शेजारील शहरातील युद्धस्थिती मदतकार्यात मोठा अडथळा ठरत आहे. अशात या व्हॉट्स ग्रुपच्या माध्यमातून शक्य ती मदत पोहचविण्याचे कार्य करण्यात येतेय. या व्हॉट्स ग्रुपमध्ये हंगेरी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, पोलंड, स्कॉटलंड इत्यादी देशात राहणाऱ्या भारतीयांचा समावेश आहे. आतापर्यंत 14 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात प्लॅटफॉर्म या संस्थेने मदत केली आहे.

चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला! नगरसेवकाला मारहाण करण्याचे कारण काय?

Video – भंडाऱ्याच्या शिवसेना आमदारांची नितीन गडकरींना साद, भाजप-शिवसेना युतीचे जुने दिवस येतील का?

नागपुरात एसीबीची मोठी कारवाई, चार लाखांची लाच घेताना अधिकारी, सीए जाळ्यात! प्रकरण काय आहे?