आईमुळं घर वाचलं; सरकारला मोठा झटका, फहीम खान प्रकरणात नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 24, 2025 | 5:55 PM

गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये जोरदार राडा झाला होता, दगडफेक करण्यात आली, या प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या फहीम खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

आईमुळं घर वाचलं; सरकारला मोठा झटका, फहीम खान प्रकरणात नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये औरंगजेबच्या कबरीवरून मोठा राडा झाला होता. दोन गट आमने-सामने आले. जोरदार दगडफेक झाली, जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. या घटनेत मोठं नुकसान झालं होतं. पोलीस देखील जखमी झाले होते. त्यानंतर या घटनेमागचा मुख्य सूत्रधार हा फहीम खान असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  दरम्यान त्यानंतर आता नागपूर महापालिकेकडून फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

मात्र या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर जी बुलडोझर कारवाई सुरू आहे, महापालिकेकडून जे पाडकाम करण्यात येत आहे, त्याला मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणात फहीम खानच्या आईने हाय कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात सुनावणी करताना कोर्टानं फहीम खानच्या सुरू असलेल्या घराच्या पाडकामाला स्थगिती दिली आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने जिथे अतिक्रम केलं होतं घराचा तो भाग पाडण्याचं काम महापालिकेकडून सुरू आहे. मात्र त्याच्या आईने हाय कोर्टात धाव घेतल्यानं मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठानं या पाडकामाला स्थगिती दिली आहे. मात्र कोर्टाची स्थगिती येण्यापूर्वीच फहीम खानचं घर जमीनदोस्त झालं होतं.

गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये मोठा राडा झाला, औरंगजेबच्या कबरीच्या वादातून हा राडा झाला. दोन गट आमने-सामने आले. दगडफेक आणि जाळपोळ देखील झाली. या घटनेत प्रचंड नुकसान झालं आहे. काही पोलीसही जखमी झाले. या प्रकरणात आरोपींना माफी मिळणार नाही, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना माफी देणार नाही, ते कबरीत जरी लपले असले तरी शोधून काढू, आरोपीची संपत्ती विकून झालेल्या नुकसानाची भरपाई करू असा इशार या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर फहीम खानच्या घरावर कारवाई करण्यात आली, मात्र आता पाडकामाला स्थगिती मिळाली आहे.