नागपूर : होळीच्या सणाला (Holi festival) हिंदू संस्कृतीत वेगळेच महत्व आहे. काल संध्याकाळी ठिकठिकाणी होळ्या पेटल्या. होळ्या पेटल्या याचा अर्थ आपल्यातील वाईट गोष्टी जाळून टाकण्यात आल्या. समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट व्हावा, असा यामागचा उद्देश आहे. होळी झाली की, दुसरा म्हणजे आजचा दिवस पाडव्याचा (Holi Padwa). पाडव्याला खवय्यांची मज्जा असते. ही मज्जा असण्याचं कारण म्हणजे सुटीचा दिवस असतो. तो एंजाय करण्यासाठी मग चिकन, मटणावर ताव मारला जातो. त्यामुळं होळीच्या पाडव्याची बात लई भारी, असं म्हटलं जातं. पण, यानिमित्त बहुतेक लोकं चिकन, मटण खरेदी करत असल्यानं या चिकन, मटणाचे भाव वाढतात. म्हणून मटणांचे भाव लई भारी होतात. नागपुरात आज सकाळीच चिकन, मटणाच्या दुकानात ग्राहकांनी (customers in the meat shop) मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
नागपुरात होळीच्या निमित्ताने चिकन, मटणाच्या दुकानात गर्दी वाढली आहे. सकाळ घराबाहेर पडून चिकन खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. भल्या पहाटेपासून दुकानदारांनी यासाठी तयारी केली होती. पाडव्याचा दिवस असल्यानं चिकनच्या दरात 20 रुपयांची वाढ कालच्या तुलनेत पाहायला मिळाली. तरीही
ग्राहकांचा चिकन, मटण खरेदीकडे मोठा प्रतिसाद दिसून येतो.
बॉयलर 220 प्रती किलो
खुल्ले 130 प्रती किलो
हैद्राबादी गावरणी 300 प्रती किलो
गावराणी 600 प्रती किलो
मटण 700 रुपये प्रती किलो