नागपूर : अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?
होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. असं ट्वीट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. हा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचा ट्विटरवरून समाचार घेतला आहे. स्वार्थासाठी सेटलमेंट करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते? संभाजी महाराज धर्मवीर होते असे ट्वीट त्यांनी केले आहे.
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्वीट करून अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.
त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असे नमूद केले आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करीत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement (सेटलमेंट) करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?
होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.
अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?
होय #धर्मवीरच !
छञपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.@AjitPawarSpeaks— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 31, 2022
दोन दिवसांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा राज्यातील चंद्रपूर व संभाजीनगर येथे दौरा आहे. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष तयारीत प्रदेश कार्यालयात व्यस्त आहेत.