नागपूर, उपराजधानीत सुपारीचा मोठा गोरोखधंदा (Illegal betel nut business) उघड झाला आहे. सडलेल्या सुपरवर प्रक्रिया करून तिला बाजारात विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईडीने नुकतीच छापेमारी (ED raid) करून 11 कोटी रुपयांची सुपारी जप्त केली. या कारवाईनंतर नागपुरातल्या (Nagpur) 100 पेक्षा जास्त सुपारी गोदामांना तीन दिवसांपासून टाळे लागले आहे. नागपुर आणि परिसरात खर्ऱ्यासाठी सुपारीचा वापर मोठ्याप्रमाणात होतो. जास्त नफा कमविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या सुपारीलाही मोठी मागणी असते.
इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, श्रीलंकेतील निकृष्ट सुपारीची नागपूरात तस्करी करण्यात येते. धक्कादायन बाब म्हणजे या देशांमध्ये घाणीत फेकलेली ही सुपारी नागपुरातील काही व्यापारी आयात करतात. ही सुपारी आसाम, चेन्नई, कोलकता येथील बंदरांवरुन भारतात येते आणि तिथून पुठे ती नागपुरात येते. या सडलेल्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती बाजारात विकल्या जाते. या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.
दुपारच्या गैरव्यवहारप्रकरणी नुकतीच ईडीने मोठी कारवाई केली. यामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. ईडीच्या या कारवाईमुळे अनेक सुपारी व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे. नागपुरातील 100 पेक्षा अधिक गोदामांना गेल्या तीन दिवसांपासून टाळे लागले असल्याचे समोर आले आहे.
डंपिंग यार्डमध्ये जाण्याच्या दर्जाची सुपारी भट्टीमध्ये टणक करण्याचा गोरोखधंदा छुप्या मार्गाने सुरु आहे. नाव बदलवून दुसऱ्या नावाने हा गोरख धंदा सुरु असल्याची माहिती सूत्रानी दिली. अद्याप या प्रकरणात कुठल्याही बड्या व्यापाऱ्याचे नाव समोर आले नसले तरी याचे तार मुंबईसह आंतरराष्ट्रीय पातळीवर जुळलेले असल्याची सूत्राची माहिती आहे. ईडीच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.