Nagpur Crime: नागपुरात आईच्या मागोमाग मुलगा गेला, अडीच वर्षाच्या मुलाचा सेप्टिक टँकमध्ये बुडून मृत्यू

| Updated on: Jun 25, 2022 | 9:43 AM

घराच्या गल्लीत असलेल्या सेप्टिक टँकवरील पाट्या विखुरलेल्या दिसल्या. मुलगा या टँकमध्ये पडला असावा, असा अंदाज पोलिसांना आला. त्यांनी सेप्टिक टँकमधील घाण बाहेर काढायला लावली. घराजवळील सेप्टिंक टँकमध्ये सक्षमचा मृतदेह सापडला.

Nagpur Crime: नागपुरात आईच्या मागोमाग मुलगा गेला, अडीच वर्षाच्या मुलाचा सेप्टिक टँकमध्ये बुडून मृत्यू
दिल्लीत दोन पत्नींकडून मिळून पतीची हत्या
Follow us on

नागपूर : उमरेड (Umred) येथे मन हेलावणारी घटना घडली. अडीच वर्षांचा सक्षम आईच्या मागोमाग जात होता. आई पुढं निघून गेली. मुलगा तिचा पाठलाग करत होता. एवढ्यात सेप्टिक टँकमध्ये (Septic Tank) पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रेवतकर लेआउट विकास कॉलनीत काल सकाळी घडली. राजेश्वर मैदमवार यांच्याकडं सक्षमची आई किरायानं राहत होती. हरियाणातील कवारी येथील सक्षम साधुराम जांगडा (Saksham Jangda) असे मृतकाचं नाव आहे. नीलम साधुराम जांगडा ही महिला बीपीएडच्या परीक्षेसाठी भाऊ दीपक जांगडा आणि मुलासह तीन दिवसांपूर्वीच उमरेड येथे आली. ते येथील रेवतकर ले-आऊट विकास कॉलनीत किरायानं राहत होते. राजेश्‍वर मैदमवार यांच्याकडे किरायाच्या खोलीत राहत होते. काल सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सक्षमची आई नीलम ही केरकचरा फेकण्यासाठी बाहेर गेली. गेटबाहेर रस्ता ओलांडून परत आली. तेव्हा तिला सक्षम दिसला नाही. एक-दोन मिनिटांतच मुलगा कुठं गायब झाला, असा प्रश्न तिला पडला. तीनं शोधाशोध सुरू केली. सोशल मीडियावर मुलगा हरवल्याचं मेसेज पाठविण्यात आला.

घराजवळील सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह

उमरेड परिसरात ही माहिती पसरली. पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. घराच्या गल्लीत असलेल्या सेप्टिक टँकवरील पाट्या विखुरलेल्या दिसल्या. मुलगा या टँकमध्ये पडला असावा, असा अंदाज पोलिसांना आला. त्यांनी सेप्टिक टँकमधील घाण बाहेर काढायला लावली. घराजवळील सेप्टिंक टँकमध्ये सक्षमचा मृतदेह सापडला.

सेप्टिक टँकनं घेतला चिमुकल्याचा बळी

सेप्टिक टँकमध्ये पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला. बाजूला सक्षमची आई नीलम रडत बसली. मुलगा याच ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या दुःखाला पारावार उरला नाही. सक्षमचे वडील साधुराम जांगडा हे हरियाणा येथून उमरेडला आले. उमरेड ग्रामीण रुग्णालयात सक्षमचे शवविच्छेदन करण्यात आले. पती पोहोचल्यानंतर जांगडा कुटुंबीय हरियाणाला आपल्या गावी रवाना झालेत. तीन दिवसांसाठी पाहुणे म्हणून आले. पण, सेप्टिक टँकनं चिमुकल्याचा बळी घेतला.

हे सुद्धा वाचा