नागपूर : इमामवाडा पोलीस स्टेशन (Imamwada Police Station) हद्दीत आज दुपारी अपघात झाला. या अपघातात ट्रकने सायकलस्वारास धडक दिली. यात सायकलचालक जागीच ठार झाला. ही घटना अशोक चौकात (Ashok Chowk) आज दुपारी बारा वाजता घडली. अशोक चौकातून 45 ते 50 वर्षे वयाचा व्यक्ती सायकल चालवित होता. ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानं तो जागीच ठार झाला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल (Police rushed to the spot) झाले. तोपर्यंत ट्रकचालक फरार झाला होता. अपघातामुळं काही काळ वाहतूक खोळंबली होती.
सायकल चालक हा सुमारे पन्नास वर्षे वयाचा आहे. तो सायकलनं अशोक चौकातून जात होता. अचानक वेगाने आलेल्या ट्रकखाली तो आला. यात सायकलस्वार ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. त्यामुळं चालकाच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. रक्ताचा सडा त्याठिकाणी पडला होता. अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. मृतदेह हटविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
अपघात झाल्यानंतर सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. लोकं आपल्याला मारहाण करतील, या भीतीने त्याने पळ काढला. पोलीस आले तोपर्यंत ट्रकचालक फरार झाला होता. पोलिसांनी काही लोकांच्या मदतीनं मृतदेह ट्रकच्या चाकाखालून काढला. त्यानंतर त्यावर चादर हातरली. मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
अशोक चौकात नेहमी गर्दी असते. कारण येथून शहराच्या चारही दिशेने जाता येते. त्याठिकाणी फारशी जड वाहतूक नसते. तरीही तिथं ट्रक कसा आला. या ट्रकचालकाचा दोष यात आहे, का याचा तपास इमामवाडा पोलीस करत आहेत.