नागपूर : शहरात तीन सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द झालीय. आता वॅार्ड पद्धतीनं आगामी महानगरपालिका (municipal election) निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरातील नगरसेवकांनी आपआपल्या पद्धतीनं निवडणूक तयारी सुरु केलीय. भाजपचे नेते आणि नगरसेवक अविनाश ठाकरे (corporator Avinash Thackeray) रोज सकाळी तीन तास सायकलवरुन आपल्या मतदारसंघात फिरतात. आणि लोकांच्या समस्या जाणून घेतात. सायकलवरुन फिरल्याने व्यायाम होतो. शिवाय आपल्या मतदारसंघात छोट्या मोठ्या गल्ल्यांमध्ये फिरुन लोकांच्या समस्या जाणून घेऊ शकतो. प्रभावी जनसंपर्क होतो. त्यामुळे मतदारसंघात (constituency) रोज तीन तास सायकलवारी करतो, असं अविनाश ठाकरे सांगतात.
सायकल चालविल्यानं व्यायाम होतो. शरीर तंदुरुस्त राहते. जनसंपर्क चांगला राहतो. लोकांना आपलसं वाटतं. संबंधित नगरसेवक सामान्य लोकांत मिसळतो, अशी प्रतिमा निर्माण होते. लोकांमध्ये आपलेपणा वाटतो, हे सारे फायदे आहेत. म्हणून सायकलचा वापर योग्य ठरतो. शिवाय प्रदूषण होत नाही. पर्यावरणपुरक अशी ही सायकल असल्याचं अविनाश ठाकरे सांगतात.
सामान्य व्यक्ती काही कारने फिरत नाही. तो सायकल किंवा दुचाकीने फिरतो. त्यामुळं जवळ जायचे असेल तर सायकलचा वापर केला जातो. लहान मुलं शाळेत जाताना सायकलच वापरतात. त्यामुळं बालकांच्या मनातही सायकल चालकांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते. मतदारांशी चांगला संपर्क साधता येतो. थांबून बोलता येते. त्यांचे प्रश्न समजून घेता येतात. ते जमिनीवर राहून सोडविता येतात. या सर्व बाबींचा निवडणुकीत फायदा होत असल्याचं अविनाश ठाकरे म्हणतात.
रोज दोन-तीन तास सायकल चालविल्यानं इतर व्यायाम करण्याची गरज नाही. कारण सायकल चालविणे हा एक चांगला व्यायाम आहे. त्यातही दोन-तीन तास सायकल चालविल्यानं शरीर तंदुरुस्त राहते. सहसा डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही.