नागपूर : महापालिकेत प्रशासक (Municipal Administrator) बसल्यामुळं लवकरच निवडणूक होणार आहे. त्यामुळं सर्व पक्ष कामाला लागले आहेत. संजय राऊत हे नुकतेच विदर्भात आले. त्यांनी नागपुरात दोन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (Shiv Sena District Head) नियुक्त केले. त्यामुळं सेनेला नवी उभारी मिळणार आहे. नागपूर मनपा निवडणुकीत शिवसेनेची स्वबळाची तयारी आहे. मनपात सत्तास्थापनेत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया (Kishore Kumeria) यांनी सांगितलं. नागपुरात शिवसेना 25 नगरसेवक निवडणूक आणणार, असल्याचंही कुमेरिया म्हणाले. मनपा निवडणुकीसाठी नागपूर सेनेत फेरबदल करण्यात आलेत.
किशोर कुमेरिया यांनी नागपूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलाय. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल, नाही तर शिवसेना स्वबळावर लढली तर 25 नगरसेवक निवडून आणू. नागपूर महापालिकेत सत्तास्थापनेत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका असेल, असं मत शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी व्यक्त केलंय. खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्यानंतर उपराजधानीत शिवसेनेत काही बदल करण्यात आलेत. किशोर कुमेरिया यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आलीय. आता नागपुरात दोन जिल्हाप्रमुख झालेत. जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मनपा निवडणूक लढणार, असं किशोर कुमेरिया यांनी सांगितलं.
दुसरीकडं, विदर्भात भाजपच्या भरवशावर निवडूण येणाऱ्यांनी शहानपण जास्त सांगू नये, अशी टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलीय. नागपूर मनपात शिवसेनेचे दोनपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले नाही. संजय राऊत यांनी विदर्भाच्या जनतेला शहाणपण शिकवू नये. असे संजय राऊत कित्येक येऊन गेलेत. विदर्भात भाजपसोबत लढली तेव्हा सेना वाढली. एकटी लढली नेस्तनाबूत झाली, हा शिवसेनेचा इतिहास असल्याचं कृष्णा खोपडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिलंय.