नागपूर : कॅन्टीनमध्ये समोसा महाग झाल्याने वकिलाने राजीनामा दिला. नागपूरच्या जिल्हा न्यायालयात असलेल्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या समोस्याची किंमत वाढविल्याने DBA (डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन)च्या (District Bar Association) सदस्याने राजीनामा दिला. अॅड. धर्मराज बोगाटी (Adv. Dharmaraj Bogati) राजीनामा देणाऱ्या सदस्याचे नाव आहे. जिल्हा न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये समोसाचे भाव वाढल्यानंतर इतर वकील हे बोगाटी यांना संघटनेचे पदाधिकारी असल्यामुळे भाव कमी करण्यासाठी विनंती करत होते. बोगाटी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय (District and Sessions Court) बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. परंतु, त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळं बोगाटी यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
नियमानुसार हायकोर्ट बार असोसिएशनच्या कॅन्टीनमध्ये जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांचे किमती या माफक दरात असाव्यात, असा नियम आहे. असे असतानासुद्धा चाळीस ते पन्नास रुपयांना समोसा विकला जात असल्याचा आरोप अॅडवोकेट धर्मराज बोगाटी यांनी केला आहे. DBA डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन ( वकिलांची संघटना) कडून चालविणाऱ्या कॅन्टीनमध्ये वकिलांना सवलतीच्या दरात समोसा मिळण्या ऐवजी महाग समोसा विकत असल्याचा आरोप राजीनामा दिलेले सदस्य अॅड. धर्मराज बोगाटी यांनी केलाय.
इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थ सुद्धा महागले आहेत. या वाढत्या महागाईचा फटका वकिलांनाही बसला आहे.
पेट्रोल, गॅसचे दर वाढलेत. वाहतूक खर्च जास्त झाला. तेलाचेही दर वाढलेत. या सर्वांचा परिणाम हा खाद्यपदार्थांवर झाला. त्यामुळं महागाई वाढली आहे. या वाढत्या महागाईचा सामना कसा करावा, असा प्रश्न वकिलालाही पडला. त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं त्यांचं म्हणण आहे. वकिलांच्या संघटनेद्वारे ही कँटिन चालविली जाते. या संघटनेच्या सदस्यपदाचा राजीनामा या वकिलानं दिलाय. कारण सदस्य असूनही कँटिनचे खाद्यपदार्थांचे भाव कसे कमी होत नाहीत, असा आरोप वकिलांनी केला होता.