सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी यासाठी उपोषणही केलं होतं. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले… आहेत. ज्यांना रिजर्वेशनचं स्पेलिंग माहित नाही. असे डझनभर मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यांना आम्ही पाडणार आहोत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बांधवांना ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांकांच्या मतदान करतील. ओबीसी असंघटित आहे. याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही, असं कोणी समजू नये. नालायक लोक विधानसभेत असलीत तर आम्ही विधानसभेत लायक माणसं पाठवू. संविधानीक तत्त्वावर बोलणारी माणसं पाठवू, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
उद्या मुंबईला जाणार आहोत. आम्ही काही लोकांची यादी बनवली आहे. त्या मतदारसंघात काम करणार आहोत. काही IT कंपन्यांसोबत बोललो आहे. 100 मतदार संघातील लोकांची मत जाणून घेतली. आम्ही प्रॅक्टिक्स करतो फक्त बोलत नाही. जातीनिहाय 100 लोकांची यादी आहेत. त्यात सर्वपक्षीय लोक, ज्यांनी जरांगेला रसद पुरविली, पाठिंबा दिला, त्यांना ओबीसी समाज पाडणार आहे, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.
रोहित पवार ज्या कर्जत जामखेडमधून निवडून आले. राजेश टोपे ज्या घनसावंगीतून निवडून येतात. तिथे ओबीसींची संख्या किती? ओबीसीने यांनी मतदान केलं नाही का? यांना फक्त जरांगे दिसतात का? राजेश टोपे म्हणतात मी सेक्युलर आहेस पण राजेश तू खरंच सेक्युलर आहे का? कारण शोषित वंचितावर हे लोक एक शब्द बोलत नाही, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्यावर टीका केलीय.
नेते लोकप्रितनिधी होण्यात, आमदार खासदार होण्यात आम्ही जनतेचा हिस्सा नाही का? चंद्रशेखर बावनकुळे स्वत: ला ओबीसी नेता म्हणून घेतात. पण ओबीसी आरक्षण जात असताना ते बोलत नाहीत. त्यांना आता लोक दारात उभे का करणार?, असं म्हणत हाके यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.