नागपूरः महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस असल्यामुळे साऱ्या राज्याचे याकडे लक्ष लागून राहिले होते. विरोधाकांसाठी हा आजचा दिवस महत्वाचा असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपला थेट निशाणा मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला. यावेळी राज्याच्या जनतेच्या समस्या आणि तरुण-तरुणींच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत त्या गोष्टीही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आहेत.
विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे प्रमुख म्हणून तुमच्याकडून येथील नागरिकांकडून अपेक्षा त्या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
महाराष्ट्रात मागील सहा महिन्यापूर्वी काय घडले आहे, ती घटना उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. त्या सहा महिन्यापूर्वीच्या गोष्टीला आजच सहा महिनेही पूर्ण झाले आहेत.
तरीही त्याच त्याच गोष्टी तुम्ही का सांगत बसत आहात. तुमचा आणि शिवसेनेचा काय वाद होता, का वाद झाला या गोष्टीशी आमचं काही देणं घेणं नाही.
आम्हाला राज्याचा विकास येथील गोरगोरीब जनतेचे प्रश्न सोडवणे गरजेचे वाटत आहेत. त्यांना आधी तुम्ही प्राधान्य द्या असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील अधिवेशनामध्ये होणाऱ्या राज्याच्या प्रमुखांची भाषणंही क्वचितच राजकीय भाषण होती. त्या भाषणामधून एकादाच मुद्दा त्या भाषणामधून मांडला जात होता. तर आता मात्र त्या उलट आता परिस्थिती बघायला मिळत आहे.
जी भाषणं विरोधकांनी करायची असतात ती भाषणं तुम्ही राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री म्हणून करत होता. आणि ती चुकीची होती, तुम्ही चुकीचा पायंडा पाडता आहात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे गटाकडून तुमच्या टीका होते, मात्र टीका राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरही आचार्य अत्रे यांनी केली होती. तीही अगदी चव्हाण शब्दातील ‘च’ काढून टाकला तर ‘व्हाण’ राहते अशी जहरी टीका करूनही त्यांनी ती टीका दिलदारपणे घेतली आहे.
त्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर द्यायचे तुम्ही द्या मात्र त्याच वेळी राज्याचे धोरण काय ठरणार, शेतकऱ्यासंदर्भात तुम्ही नवीन काय मांडणार त्याकडे लक्ष द्या. तुमच्या वयाच्या मुलांनाच टीका करण्यावरून तुम्ही त्यांना टार्गेट करत आहात. आणि ही गोष्ट चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. राज्याचं हित लक्षात ठेवून तुमचे केंद्र सरकारबरोबर संबंध चांगले आहेत.
अमित शाहांबरोबर संबंध चांगले आहेत तर त्या गोष्टी तुम्ही राज्याच्या हितासाठी उपयोगामध्ये आणा असं स्पष्टपणे त्यांना सल्लाही देण्यात आला आहे. सीमावादावर केंद्राकडून मदत घेऊन तो निकालात काढण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.