नागपूर : नागपुरात सीताबर्डी परिसरात 15 लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त (15 lakh liquor seized) करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागानं केली. मध्यप्रदेशात तयार झालेली बनावट दारु जप्त करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) अधीक्षक सोनोने यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.
मध्यप्रदेशात तयार करून बनावट मद्यसाठी नागपुरात नवर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आणण्यात येत होता. एका फर्निटर विक्रेत्यानं नववर्षाची कमाई करण्यासाठी हे केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीवरून उपायुक्त मोहन वर्दे आणि अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दोन पथके तयार केली. सीताबर्डीतील शनिमंदिराजवळच्या मंगलम ट्रेडर्स तसेच वर्धा रोडवरील नवजीवन कॉलनीत शुक्रवारी रात्री छापे टाकण्यात आले. पथकाला येथे मोठ्या प्रमाणात दारूसाठा सापडला.
हंडरेड पाईपर, जॉनी वॉकर, ब्लेंडर राईड, रॉयल स्ट्रगसह विदेशी दारूच्या बाटल्या दोन्ही ठिकाणांहून जप्त केल्या. या प्रकरणी सुभाष वटी आणि भोजराज रघटाटे या दोघांना अटक करण्यात आली. निरीक्षक प्रवीण मोहतकर, सुभाष खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
थर्डी फर्स्ट आणि न्यू इयरसाठी दारू पार्ट्या आयोजित केल्या जातात. दारू-खरेदी विक्रीचे प्रमाण मोठे असते. हे लक्षात घेऊन हा बनावट दारूसाठी मागविण्यात आला. पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करांचा डाव उधळून लावला. बनावट मद्यविक्री करून मद्यपींच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक प्रमोद सोसोने यांनी केली. ही माहिती 8422001133 या व्हॉट्सअप क्रमांकावर द्यावी किंवा 8008333333 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागानं कळविले आहे.