नागपूर : चोरी करण्यासाठी चोर कोणता फंडा वापरातील काही सांगता येत नाही. असाच एक नवा फंडा नागपुरात वापरताना दिसून आले. नागपूर जिल्ह्यातील वडद येथे दारु तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. ट्रकची कॅबीन (Truck cabin) आणि ट्रॉली (trolley) यामध्ये जागा बनवून ही तस्करी (Smuggling) केली जात होती. छापादरम्यान ट्रॉलीची लांबी जास्त दिसत होती. विशेष चौकशी केल्यानंतर ही बाब लक्षात आली. एका चित्रपटात अशीच स्टोरी आहे. आरोपी पळून जाताना लांब कंटेनरचा वापर करतो. हीच पद्धती या चोरीदरम्यान वापरली होती. तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळं एक आरोपीला अटक करण्यात आली. इतर आरोपींनी पळ काढला. आता त्या पळणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.
एका ट्रकमध्ये छुपा कप्पा बनवून लाखो रुपयांची दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वडद परिसरात दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विभागाच्या विशेष पथकाने सबंधित ठिकाणी छापा टाकून 2 हजार लिटर स्पिरीट म्हणजेच शुद्ध मद्यार्क जप्त केले आहे. विशेष म्हणजे तस्करीसाठी वापरलेल्या या ट्रकमध्ये ड्रायव्हरची केबिन आणि पाठीमागची ट्रॉली यादरम्यान विशेष जागा बनवून मद्य तस्करी केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारावर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. ट्रकची एकूण लांबी खूप जास्त असतानाही त्याची ट्रॉली तुलनेने कमी लांबीची असल्याचे पथकाच्या लक्षात आले.
अधिकाऱ्यांनी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये चढून तपासणी केली. ड्रायव्हरची केबिन आणि ट्रॉलीच्यामध्ये विशेष कप्पा बनवण्यात आल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नटबोल्ट उघडून त्या भागाची पाहणी केली. त्या ठिकाणी दहा ड्रम शुद्ध मद्यार्क म्हणजेच स्पिरीट लपवण्यात आल्याचे उघड झाले. दारूची अवैध निर्मिती करण्यासाठी हे स्पिरीट वापरले जाणार होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. इतर आरोपी फरार झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख रुपयांचा मुद्देमाल याप्रकरणी जप्त केला आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी दिली.