नागपूर : पुण्यात (Pune) ‘मेक इन इंडिया’ (Make in India) अंतर्गत देशातील पहिल्या अॅल्युमिनिअम (Aluminium) बॉडीची मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो मेसर्स तितागड वॅगन कंपनी तयार करत आहे. मेट्रोचे कोचेस संपूर्णपणे अॅल्युमिनियम धातूपासून निर्माण करण्यात येणार आहेत. कोलकाता स्थित तितागड वॅगन कंपनीने पुण्याच्या महामेट्रोसाठी अॅल्युमिनियमच्या कोचचे लाँचिंग केलं आहे. तितागड वॅगन कंपनीला डिझाईन, उत्पादन, पुरवठा अशा अटींवर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 102 कोचेसच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आलं आङे. करारातंर्गत पश्चिम बंगालच्या कारखान्यात निर्मित तीन ट्रेन इटलीला पाठविणार असून भारतातील वातावरण आणि प्रवाशांच्या गरजेनूसार तयार केलेल्या उर्वरित 31 ट्रेन पुण्यात पाठविण्यात येणार आहेत.
पुण्यात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशातील पहिल्या अॅल्युमिनिअम बॉडीची मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रोला यासाठी 31 ट्रेन पाठवण्यात येणार आहेत. ही मेट्रो मेसर्स तितागड वॅगन कंपनी तयार करणार असून ती संपूर्ण अॅल्युमिनिअम धातूपासून निर्माण करण्यात येणार आहे.
कोलकाता स्थित तितागड वॅगन कंपनीने पुण्याच्या महामेट्रोसाठी अॅल्युमिनिअमच्या कोचचे लाँचिंग केलं आहे. तितागड वॅगन कंपनीला डिझाईन, उत्पादन, पुरवठा अशा अटींवर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 102 कोचेसच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आलेलं आहे.
करारातंर्गत पश्चिम बंगालच्या कारखान्यात निर्मित तीन ट्रेन इटलीला पाठविणार असून भारतातील वातावरण आणि प्रवाशांच्या गरजेनूसार तयार केलेल्या उर्वरित 31 ट्रेन पुण्यात पाठविण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र येत्या 1 एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात 1 एप्रिल 2020 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मेट्रो अधिभारावर सवलत देण्यात आली होती. ही मुदत 31 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून मेट्रो अधिभार आकारला जाणार आहे.