गाडी चालवताना भीती वाटते? Simulator समोर बिनधास्त सराव करा, नागपूर RTO ची भन्नाट डोकॅलिटी

| Updated on: Feb 03, 2022 | 2:29 PM

वाहन परवाना परीक्षा पास होण्यासाठी आता तुम्हाला सिम्युलेटर म्हणजेच आभासी वाहन मदत करणार आहे. या सिम्युलेटरवर बसून अपघाताची कुठलीही भीती न बाळगता तुम्ही बिनधास्तपणे वाहन चालवण्याचा सराव करु शकता.

गाडी चालवताना भीती वाटते? Simulator समोर बिनधास्त सराव करा, नागपूर RTO ची भन्नाट डोकॅलिटी
नागपूर आरटीओमध्ये सिम्युलेटर
Follow us on

नागपूर : वाहन चालक परवाना (Driving License) मिळवणं, हे अनेकांचं लहानपणापासून स्वप्न असतं. मात्र प्रत्यक्ष वाहन चालवण्यास शिकताना अनेक जणांना अपघात होण्याची भीती वाटते. थेट गाडीत बसून सराव करताना कोणाला दरदरुन घाम फुटतो, तर कोणाचे हातपाय लटपटतात. आता अॅक्सलरेटर आणि ब्रेकवर पाय ठेवल्यावर ते लटपटले, तर काय करायचं. अशावेळी नागपूर आरटीओने (Nagpur RTO) शिकाऊ वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे. वाहन परवाना परीक्षा पास होण्यासाठी आता सिम्युलेटर म्हणजेच आभासी वाहन तुम्हाला मदत करणार आहे. म्हणजे या सिम्युलेटरवर (Car Simulator) बसून अपघाताची कुठलीही भीती मनात न ठेवता तुम्ही बिनधास्तपणे वाहन चालवण्याचा सराव करु शकता.

वाहन परवाना घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. वाहन परवाना परीक्षा पास होण्यासाठी आता तुम्हाला सिम्युलेटर म्हणजेच आभासी वाहन मदत करणार आहे. या सिम्युलेटरवर बसून अपघाताची कुठलीही भीती न बाळगता तुम्ही बिनधास्तपणे वाहन चालवण्याचा सराव करु शकता.

कोणासाठी कार सिम्युलेटर?

नागपूर आरटीओने आपल्या कार्यालयात सिम्युलेटर म्हणजे आभासी वाहन लावलं आहे. ज्यांना स्वतःच्या वाहनावर सराव करताना भीती वाटते, किंवा ज्या व्यक्ती वाहन परवाना परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. अशा सर्व शिकाऊ वाहन चालकांना या कार सिम्युलेटरवर सराव करता येणार आहे.

कसा आहे कार सिम्युलेटर?

सिम्युलेटरवर आपल्या कारप्रमाणे गिअर, स्पीड मीटर, इंडिकेटर अशा सर्व गरजेच्या बाबी लावण्यात आल्या आहेत. हातात स्टिअरिंग व्हीलही असल्याने तुम्हाला खऱ्याखुऱ्या गाडीतच बसल्याचा फील येणार आहे.

संबंधित बातम्या :

नवीन निवासी इमारती बांधताय, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा केलीत काय?, सरकारी जीआर काय सांगतो…

नागपुरातल्या प्रभागरचनेचा कुणाला फायदा, कुणाला फटका? एका क्लिकवर नवी प्रभागरचना

 नव्या सीमांमुळे अनेक उभेच्छुकांचा हिरमोड; मनपा आयुक्त म्हणतात, आक्षेप, सूचना मागविल्या