महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रँडमास्टर, नागपुरात आगमन होताच पुढचं लक्ष्य सांगितलं!
संकल्प गुप्ता हा भारताचा 71 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. ग्रॅंडमास्टर बनवलेल्या नागपूरातील 18 वर्षांचा बुद्धीबळपटू संकल्प गुप्ता याचं नागपूरात आगमन झालंय. सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्प गुप्ताने अवघ्या 24 दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. नागपुरात आगमन झाल्यानंतर संकल्प गुप्ताने पत्रकारांशी संवाद साधला.