भंडारा : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रत्नागिरी, मालेगाव, औरंगाबाद आणि आता नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत असल्याने याच्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे या सभेची जोरदार चर्चा सुरू असतानाच मविआतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या हातात आयते कोलीतच मिळाले आहे.त्यामुळे आता विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे नाराजी नाट्य समोर आले आहे.
उद्धव ठाकरे नागपूरात वज्रमूठ सभेसाठी हजर झालेले असतानाच आता काँग्रेसचे आमदार नितिन राऊत यांच्या नाराजी नाट्यामुळे ही सभा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
यावेळी आमदार नितिन राऊत यांना वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार काय? असा सवाल उपस्थित करताच त्यांनी त्यावर बोलणे टाळले असल्याने त्यांच्या मौनावरून आता तर्क वितर्क लढविले जात आहे. त्यामुळे वज्रमूठ सभेला तु्म्ही उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला असता त्यावर नितिन राऊत यांनी बोलणे का टाळले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
वज्रमूठ सभेविषयी महाविकास आघाडीतील नेते विश्वासाने बोलत असतानाचा मविआतील नितिन राऊत यांनी माध्यमांबरोबर बोलताना त्यांनी विषय का टाळला असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
नितिन राऊत यांनी फक्त वज्रमूठ सभेविषयी बोलणेच टाळले नाही तर त्यांनी हात जोडल्याने आता उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
नागपुरला आज महाविकास आघाडीची सभा असूनही महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र काँगेसचे नेते नितिन राऊत हे नाराज असल्याने ते आजच्या या सभेत उपस्थित राहणार की नाही अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.