“आता तुमचे अधःपतनाचे दिवस येणार”; वज्रमूठ सभेत सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला

| Updated on: Apr 16, 2023 | 7:35 PM

हे सरकार पाडून ज्यांनी सत्ता स्थापन केली, त्याच उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत सांगितले होते, की, हे ईडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यामध्ये खरचं तथ्य होते. कारण महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीच्याच धमकीवर हे सरकार स्थापन केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

आता तुमचे अधःपतनाचे दिवस येणार; वज्रमूठ सभेत सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला
Follow us on

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी, मालेगाव, औरंगाबाद आणि आता नागपूरमध्ये जंगी सभा होत आहे. या वज्रमूठ सभेकडे गेल्या काही दिवसांपासून साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच प्रमाणे सत्ताधाऱ्यांनीही उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार या सरकारला हात वर करून सांगा की, या सरकाला त्यांनी चले जाव असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेवरही जोरदार हल्ला बोल केला आहे.

नागपूरात वज्रमूठ सभा होत असतानाच विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी रोजगार, महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

गॅस आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्यानंतर ज्यांनी काँग्रेसच्या काळात आंदोलन केले होते. त्याच लोकांनी आता गॅस आणि पेट्रोलच्या किंमती वाढवून जनसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केले आहे असा घणाघातही त्यांनी भाजपवर केला आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी त्यांना अरे राक्षसांनो तुम्हाला आता महागाई, बेरोजगारीवरून सामान्य माणूस तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि काँग्रेस हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

राक्षसांनो सामान्य माणूस तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत भाजपनने देशात फक्त धार्मिक मु्द्दा पसरवून समाजा समाजात दुही माजवण्याचं काम भाजपने केले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हे सरकार पाडून ज्यांनी सत्ता स्थापन केली, त्याच उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत सांगितले होते, की, हे ईडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यामध्ये खरचं तथ्य होते. कारण महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीच्याच धमकीवर हे सरकार स्थापन केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.