नागपूर : नागपूर : आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे हे आज नागपुरात आहेत. राजेश टोपे म्हणाले, शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न सोडवण्यावर भर राहील. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. आम्ही सर्वच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत आदर आहे. पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे (NCP) आहेत. त्यांना लोकसभेची (Lok Sabha) उमेदवारी दिली होती. त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत. यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
राजेश टोपे यांनी सांगितलं की, अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात विकास व्हायला हवा. सलील देशमुख जबाबदारीने काम करतायत. सलील देशमुख यांना सर्व मंत्री सहकार्य करत आहेत. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत काटोल मतदार संघातील विकास थांबायला नको. काटोल मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आशिष जैसवाल यांनी विकासकामांसाठी कमी निधी मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राजेश टोपे म्हणाले, शिवसेना आ. आशिष जैसवाल हाडाचा कार्यकर्ता आहे. मेहनती आहे. त्यांच्या मतदारसंघाचा विकास व्हायलाच हवा. ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. आम्ही सर्व मिळून आशिष जैसवाल यांच्या मतदारसंघाचा विकास करुन दाखवू, असंही टोपे म्हणाले.
कोरोनाचा आजचा आकडा 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडची चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. कोरोना रुग्ण वाढत नाही. लसीकरण चांगलं झालंय. ॲक्टिव्ह रुग्ण 1950 आहेत. सध्या हा फार मोठा विषय नाही. गर्दी करतायत. राजकीय मेळावे करतात. तरीही कोरोना रुग्ण अपेक्षित वाढत नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही. बुस्टर डोजबाबत केंद्राच्या सूचना आहे. त्यानुसार बुस्टर डोज देतोय. ॲटीबॉडीजची टेस्ट करुन लोक बुस्टर बाब निर्णय घेत आहेत.