आरटीईच्या निधीत मोठा घोटाळा, नागपुरातील 25 शाळा व्यवस्थापनाचा गंभीर आरोप, याचिका दाखल

| Updated on: Aug 13, 2021 | 10:50 PM

राज्याकडून आरटीई अंतर्गत शाळांना दिल्या जाणाऱ्या निधीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप नागपूर विभागातील 25 शाळांच्या व्यवस्थापनाने केलाय. यासंदर्भात शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलीय.

आरटीईच्या निधीत मोठा घोटाळा, नागपुरातील 25 शाळा व्यवस्थापनाचा गंभीर आरोप, याचिका दाखल
सांकेतिक फोटो
Follow us on

नागपूर : राज्याकडून आरटीई अंतर्गत शाळांना दिल्या जाणाऱ्या निधीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप नागपूर विभागातील 25 शाळांच्या व्यवस्थापनाने केलाय. यासंदर्भात शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलीय. या याचिकेच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. (management of 25 schools in Nagpur alleges fraud in the fund provided to schools under RTE by state government)

नेमका प्रकार काय आहे ?

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मागील चार वर्षांपासून अनेक शाळांना आरटीईचा परतावा मिळालेला नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला आरटीईसाठी तब्बल 4 हजार 401 कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी दिलेली आहे. या रकमेपैकी राज्य सरकारने शाळांना फक्त 717 कोटी रुपये दिले. बाकीचे 3700 कोटी रुपये अद्याप वाटप केलेले नाहीत. पैसेच वाटप केले नसल्यामुळे यात घोटाळा झाला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष

या प्रकरणी निवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशीची करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय. या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश कसा दिला जातो ?

दरम्यान, आरटीई अंतर्गत खासगी विना-अनुदानित शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (entry level) वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या राखीव जागांवर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येऊन प्रवेश दिले जातात. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला आदी कागदपत्रांची गरज असते. अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! औरंगाबादेत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात विषबाधा, गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली

नाकाबंदी सुरु असताना गाडी थांबवली, वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण, कल्याणमधील धक्कादायक घटना

बंदी असताना बैलगाडा शर्यतीचं आयोजन, गोपीचंद पडळकरांकडून बक्षिसांची खैरात, ठाकरे सरकार कारवाई करणार ?

(management of 25 schools in Nagpur alleges fraud in the fund provided to schools under RTE by state government)