नागपूर : नऊ महिन्याची गरोदर महिला पतीसोबत डॉक्टरांकडे जात होती. अचानक अपघात झाला. यात ती गंभीर जखमी झाली. भंडारा येथे प्राथमिक उपचार (First Aid at Bhandara) केले. त्यानंतर नागपुरात शुअरटेक हॉस्पिटलमध्ये (Shuertech Hospital at Nagpur) पाठविण्यात आले. आयसीयू डायरेक्टर डॉ. निर्मल जयस्वाल (Dr. Nirmal Jaiswal ) यांनी रुग्णाची तपासणी केली. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होत होता. शिवाय अन्य अवयव निकामी होण्याचा धोका होता. सीटी स्कॅन करण्यात आले. मेंदूमध्ये रक्त जमा झाल्याने गाठ झाली होती. मेंदूवर सुज आली होती.
गरोदरपणात झालेला अपघात, मेंदूला इजा, श्वास घेताना होणारा त्रास अशा अनेक अडचणी होत्या. कमी होणारा ऑक्सिजन अशी जोखीम होती. अशा परिस्थितीमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. प्रसूतीनंतर पाच मिनिटांहून अधिक काळ लोटला तरी बाळ रडला नाही. तर त्याच्या जीवाला बहुधा धोका निर्माण होतो. बाळ जन्मल्यावर रडला नाही. पण बालरोगतज्ज्ञांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळं बाळाच्या जीवाचे रक्षण झाले.
या रुग्णाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. आलोक उमरेडकर यांनी केली. प्रसूतीसाठी डॉ. श्वेताली देशमुख, जन्मलेल्या बाळावरील उपचारासाठी डॉ. अर्चना जयस्वाल, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भावेश बरडे व सुंगणीतज्ज्ञ डॉ. रवी मुंदडा यांच्या चमूने रुग्णावर उपयार केले. या रुग्ण महिलेच्या घरच्यांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला. तातडीने परवानगी दिली. उपचारांचा गोल्डन अवर मिळाला. स्पेशालिटीच्या तज्ज्ञांनी एकत्र मिळून उपचार केले. त्यामुळं रुग्णाला जीवदान मिळाले, असे डॉ. जयस्वाल यांनी सांगितलं.