Nagpur : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी गाडी चालवायला थेट नागपुरातून फडणवीसांचे फेव्हरेट ड्रायव्हर कामगिरीवर

| Updated on: Sep 06, 2022 | 1:02 PM

Nagpur Sharad Pandey : शरद पांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून नागूपर पोलीस दलात कार्यरत आहेत. इतकंच काय तर शरद पांडे गेल्या अनेक वर्षांपासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चालक आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ते फेव्हरेट ड्रायव्हर असल्याचंही बोललं जातं.

Nagpur : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी गाडी चालवायला थेट नागपुरातून फडणवीसांचे फेव्हरेट ड्रायव्हर कामगिरीवर
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पांडे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai) यांचा सोमवारी मुंबई दौरा होता. या दौऱ्यावेळी सह्याद्री अतिथीगृह, लालबागचा राजा, आशिष शेलाराचं वांद्रेतील घर, त्यानंतर फडणवीसांचा सागर बंगला, मग पुन्हा मुंबई विमानतळ असा भरगच्च कार्यक्रम होता. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी खास नागपुरातून (Nagpur) चालकाला बोलावण्यात आलं होतं. मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह यांच्या गाडीच सारथ्य नागपुरातील माणसानं केला. त्याच्या गाडीच्या चालकाचं नाव होतं शरद पांडे. नागपूर पोलीस (Nagpur Police) दलातील नायक पोलीस कॉन्स्टेबल शरद पांडे.

..म्हणून नागपुरातले पांडेजी मुंबईत आले!

शरद पांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून नागूपर पोलीस दलात कार्यरत आहेत. इतकंच काय तर शरद पांडे गेल्या अनेक वर्षांपासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चालक आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ते फेव्हरेट ड्रायव्हर असल्याचंही बोललं जातं.

कदाचित त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चालकाना नागपुरातून खास मुंबईत विशेष कामगिरीसाठी बोलावण्यात आलं होतं. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर शरद पांडे यांनीच गाडी चालवली होती. शरद पांडे हे मूळचे नागपूरमधील राहणार आहेत. ते एक सराईत चालक म्हणून पोलीस खात्यात ओळखले जातात.

हे सुद्धा वाचा

‘मिशन मुंबई’साठी शाहांचा दौर

लवकरच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात होता. अमित शाह यांनी मिशन 150 असं टार्गेट भाजपच्या राज्यातील नेत्यांना मुंबई पालिकेसाठी दिलं आहे. या दौऱ्यावर लालबागचा राजाचं दर्शनही अमित शाह यांनी घेतलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच एकनात शिंदेदेखील त्यांच्यासोबत होते. यानंतर आशिष शेलारांच्या घरच्या गणपतीचं दर्शने त्यांनी घेतलं. अखेर फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्यानंतर त्यांनी भाजपचे मंत्री, आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोलही केला. तसंच भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला पालिका निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचनाही केल्या.