नागपूरः वाशिममधील गायरान जमिनीच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीह होती. त्यातच आज हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्याने विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल चढविला. हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेच त्याचबरोबर त्यांनी जाता जाता पवार कुटुंबीयांवरही त्यांनी निशाणा साधला.
वाशिममधील 37 एकर गायरान जमिनीच्या वाटपावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या आरोपांवरून मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, मी फाटक्यांना मदत केली आहे. मी गोरगरीबांना मदत केली असून लवासासारखे तर मी प्रकल्प उभा केले नाहीत असा टोला त्यांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. लवासासारखे प्रकल्प उभा केले नाहीत, असं म्हणताच त्यानी ही राजकीय टीकाही नाही असंही त्यांनी म्हटले आहे.
गायरान जमिनीच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, मी गरीब आणि फाटक्यांना मदत केली आहे. तर काहींनी एक एक रुपये देऊन, अगदी नाममात्र पैसे देऊन शंभर पासून ते अगदी पाचशे एकरपर्यंत जमिनी घेतल्या असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मी ज्या गरीबांना जमीन दिली आहे, त्याचा मला काही पश्चातापही होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला नाही.
अब्दुल सत्तार यांनी लवासा प्रकल्पाचे नाव पुढं करून त्यांनी पवार कुटुंबीयांना टोला लगावला आहे. लवासा प्रकल्पावरून पवार कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी लवासा प्रकल्पाचा उल्लेख करून त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे.