नागपूर : शिवसेना आमदार आशिष जैसवाल (Ashish Jaiswal) यांनी वाहतूक पोलिसांविरोधात संताप व्यक्त केलाय. आशिष जैसवाल यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांवर (Nagpur Rural Police) गंभीर आरोप केलेत. जैसवाल यांच्याकडून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. खिंडसी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलीस अवैध वसुली करत आहेत. त्यांना दोन-तीन वेळा समजावलं पण, ते काही एकायला तयार नाहीत, असं आमदार जैसवाल म्हणाले. त्यानंतरचे दृश्य. आमदार जैसवाल गाडीतून उतरले. बाजूला वाहतूक पोलिसांची (Traffic Police ) गाडी होती. जैसवाल म्हणाले, काय सुरू आहे तुमचं इकडं. तुम्हाला सांगितलं ना, वसुली करायची नाही म्हणून. समजत नाही का तुम्हाला. वाहतूक पोलिसांवर ते चांगलेच ओरडले. यावेळी त्यांचा संताप अनावर झाला. जैसवाल यांच्यासोबत काही कार्यकर्तेही होते. वसुली करता येथे, असं म्हणताच पोलिसांनी माघार घेतली.
पोलीसमध्ये नोकरी लागली म्हणून बॉस झाले का तुम्ही. काही लोकांच्या लायसन्स पोलिसांनी जप्त केल्या होत्या. पोलिसात नोकरी लागली म्हणून गरिबांकडून पैसे वसूल कराल का. तुम्हाला लाच वाटत नाही का. तुमचा एसपी कोण आहे, ते सांगा. रोज लोकांकडून पैसे वसूल करता. लाच वाटायला पाहिजे तुम्हाला. गाडीचे कागदपत्र जप्त केल्याची तक्रार एका नागरिकानं केली. फाईन कशाचं पाहिजे, असा सवाल वाहतूक पोलिसांना केला. खबरदार कोणी वसुली करताना दिसला तर… कोण आहे तुमचा एसपी बोला. मी बोलतो तुमच्या एसपींशी. नोकरी लागली तर कमीतमी गरिबांची सेवा करा, असा सल्लाही आमदार जैसवाल यांनी पोलिसांना दिला.
आमदार आशिष जैसवाल यांनी नागपूर ग्रामीण आणि वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. pic.twitter.com/5Hi603RAkL
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 9, 2022
तुम्हाला लाच वाटत नाही का. गरिबांना पैसे मागून लुटता. तुम्हाला वसुलीचे अधिकार कुणी दिले. एकाने तक्रार केली की, माझ्याकडून अडीचशे रुपये घेतले. पण, पावती दिली नाही. थोड्या अंतरावर रामटेक पोलीस, थोड्या अंतरावर वाहतूक पोलीस हे उभे राहतात. दुचाकीस्वाराला थांबवून त्यांच्याकडून कागदपत्र मागतात. त्यानंतर हे कमी आहे. ते नाही आहे, असे नियम सांगून पैसे वसूल करतात, असा गंभीर आरोप आमदार जैसवाल यांनी केलाय. माझ्या क्षेत्रामध्ये अशाप्रकारची कुठलीही अवैध वसुली मी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.