नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये वैर वाढत असतानाच, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळेच परप्रांतीयांचा मुद्द्याला बगल देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने मनसे नेत्याची राष्ट्रीय स्तरावरील ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटना
विदर्भातील मनसे नेते राजू उंबरकर यांची ‘हिंद मजदूर सभे’चे महाराष्ट्रात महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेच्या हाती राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेची धुरा आली आहे. ‘हिंद मजदूर सभा’ देशातील WCL (Western Coalfields Limited) कामगारांची मोठी संघटना आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करत मनसेनं ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री केली.
राजू उंबरकर काय म्हणतात
‘आता मनसे स्टाईलने हजारो WCL कामगारांसाठी काम करणार असून, WCL ने जमिनी घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाहीत, असं म्हणत गरज भासल्यास प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कामगारांसाठी मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा हिंद मजदूर सभेचे नवनियुक्त महाराष्ट्र महासचिव राजू उंबरकर यांनी दिलाय.
पाहा व्हिडीओ :
चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट
दरम्यान, राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती होण्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली होती. तर त्याआधी नाशिकमध्येही दोघा नेत्यांची धावती भेट झाली होती.
“परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही”
दरम्यान, भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. राज ठाकरेंनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ती क्लिप ऐकली. त्यावरुन आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या :
‘ती’ भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?
राज ठाकरे माझ्या घरी चहाला आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल : चंद्रकांत पाटील