Bullet Train | मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुसाट! अहवाल अंतिम टप्प्यात; रावसाहेब दानवेंनी दिली प्रकल्पाबाबत माहिती

| Updated on: Dec 28, 2021 | 10:17 AM

रेल्वेमार्गे अंतर 833 किमी असून, 10 तास 55 मिनिटे लागतात. पण, बुलेट ट्रेन झाल्यास 736 किलोमीटरचे हेच अंतर साडेतीन तासांत कापता येईल.

Bullet Train | मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुसाट! अहवाल अंतिम टप्प्यात; रावसाहेब दानवेंनी दिली प्रकल्पाबाबत माहिती
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : देशभरात हाय स्पीड रेल्वेचे कॉरिडोर बनविण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई-नाशिक-नागपूर आणि मुंबई-पुणे बुलेट ट्रेन तयार करण्याचे ठरले होते. सोमवारी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रबंधन निदेशक सतीश अग्निहोत्री यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर या ट्रेनचे प्रेझेंटेशन केले. या दोन्ही कॉरिडोरसाठी डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टवर अंतिम टप्प्यात काम सुरू असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी सोमवारी दिली.

मुंबई-पुणे तसेच हैद्राबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल सहा महिन्यांत सादर करण्यात येणार आहे. मुंबई ते नागपूर या 736 किलोमीटर मार्गाचे हवाई सर्वेक्षण सुरू आहे. याशिवाय या प्रकल्पाचे रेखाचित्र, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम यासह अन्य कामे केली जात आहेत. मुंबई ते नागपूर ही ट्रेन नाशिक, अदमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती व वर्धा या जिल्ह्यांतून धावणार आहे.

 

जागतिक बँकेला अहवाल सादर केल्यानंतर काम

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. हा महामार्ग दहा जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासन आणि रेल्वे कमिटीदेखील कामाला सुरुवात करणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करून जागतिक बँकेला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

750 प्रवासी क्षमता

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला रेल्वे मंत्रालयालयाने सात हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी डीपीआर तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रस्तावित मुंबई-नागपूर हा दुसरा प्रकल्प असून मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरनंतर मुंबईवरून सुरू होईल. केंद्र आणि राज्य सरकार असा हा संयुक्त उपक्रम आहे. मुंबईहून नागपूरकडे जाताना राज्याच्या ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर अशा दहा जिल्ह्यांमधून ही हायस्पीड बुलेट ट्रेन जाईल. 736 किलोमीटर लांबीच्या मार्गात उन्नत ग्रेडमध्ये आणि बोगद्यातूनदेखील ही रेल्वे जाईल. 750 प्रवासी क्षमतेची ही गाडी राहील.

 

मार्गावर राहणार 14 स्टेशन

मुंबई-नागपूर रस्त्यावर एकूण 14 स्टेशन राहतील. शाहपूर, इगतपुरी, नाशिक, सिन्नर, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, जरहांगीर, कारंजा, पुलगाव, वर्धा, खापरी आणि नागपूर अशा स्थानकांचा समावेश आहे. यासाठी 15 ठिकाणी बोगदे खोदण्यात येणार आहेत. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू झाल्यास अवघ्या साडेतीन तासांत हे अंतर कापले जाईल. जुलैमध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सादरीकरणदेखील करण्यात आले.

 

साडेतीन तासांत कापता येणार अंतर

या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पाच पाच मोबदला दिला जाणार आहे. आतापर्यंत 44 टक्के जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. परंतु, राजकीय हस्तक्षेपामुळं जमीन हस्तांतरणात अडथळे निर्माण केले जातात. मुंबई-नागपूर रस्त्याने 844 किमी अंतर कापावे लागते. त्यासाठी 15 तास 47 मिनिटे लागतात. विमानाने हेच अंतर 688 किलोमीट असून, त्यासाठी 1 तास 40 मिनिटे लागतात. तर, रेल्वेमार्गे अंतर 833 किमी असून, 10 तास 55 मिनिटे लागतात. पण, बुलेट ट्रेन झाल्यास 736 किलोमीटरचे हेच अंतर साडेतीन तासांत कापता येईल.

NMC scam | पालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याच्या सुरस कथा! चार रुपयांचा पेन 34 रुपयांना; आणखी कसे वाढत गेले रेट?

Suicide note | सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!

Nitin Gadkari | ‘फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे’, असं नितीन गडकरी का म्हणाले?