मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या वज्रमूठ सभेला संबोधित करताना शिंदे-फडणवीस सरकारवर आसूड ओढलंय.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ती देण्यात आला? सच्च्या समाजसेवकासमोर झुकावं लागतं. आप्पासाहेब यांचं घराणं मोठं आहे. या घराण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचं घराणं व्यसनमुक्तीचं काम करतात. दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते. एवढी लोकं जमली आहेत. पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
जगाच्या श्रीमंतीत अव्वल, यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालला आहे, पण गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे. ही तीच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. हा डेकोरेशनचा भाग नाही. भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरु आहे. एका माणसाने देशाला घटना दिली. मग एवढी मोठी जनता संविधान वाचवू शकत नाही. मी घटना बचाव करणार असं म्हणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं म्हणेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.