सुनिल ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा काल संध्याकाळी निर्णय आला. अजित पवार गट हाच राष्ट्रवादी पक्ष आहे आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाचं आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यावर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. मोठा दावा करत त्यांनी बॉम्ब फोडला आहे. काही आमदार निधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. पण आता मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले.
सर्व ठरलेल्या प्रमाणे सूड बुद्धीचं राजकारण सुरू आहे आधी ठाकरे ची शिवसेना शिंदे यांना दिली. आता आमचा पक्ष अजित पवार यांना दिला. पण सर्वांना माहीत आहे की, पक्ष कोणी स्थापन केला. आमचा पक्ष शरद पवार आहेत आणि आमचं निवडणूक चिन्हही शरद पवारच आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय सूड बुद्धीने दिला आहे. आज शरद पवार आज चिन्हाबाबत निर्णय घेतील, असं अनिल देखमुख म्हणाले.
माझ्या मतदारसंघातील परडशिंगा येथे भाजपने एक महिला मेळावा आयोजित केला. हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सरकारी अधिकारी खंड विकास अधिकारी यांनी सचिवांना पत्र पाठविलं तुम्ही लोकांना घेऊन या. शासकीय पत्र काढून हे सांगितलं जातं आहे. मेळावा भाजपचा आहे. मात्र त्या साठी खर्च सरकारकडून केला जाणार आहे. याची रीतसर तक्रार आम्ही करू. पक्षाच्या मेळावा साठी शासकीय यंत्रणेचा वापर आता पर्यंत झाला नाही, तो आता होत आहे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत काल निर्णय आल्यानंतर राष्ट्रवादीत आता घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांचा मुक्काम दिल्लीतच असणार आहेत. दोन दिवस शरद पवार दिल्लीतच थांबणार आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. आज उद्या दिल्लीत थांबूनच पवार बैठका घेणार आहेत. पवारांसह सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि इतर पदाधिकारी राजधानी दिल्लीतच असणार आहेत. इथूनच पवार सूत्र हलवणार असल्याची माहिती आहे.