नागपूर : राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असले तरी सध्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील रुग्णआलेख घटला आहे. नागपूरमध्येही रुग्ण कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागपुरात येत्या 1 जूनपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
नागपुरात 1 जूनपासून नवी नियमावली
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. याच कारणामुळे य़ेथे येत्या 1 जूनपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आलेयत. त्याबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत न मोडणारे परंतु एकटी दुकानेसुद्धा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. ही दुकाने आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरु ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. मॉल बंदच असतील.
1. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
2. अत्यावश्य सेवेत न मोडणारी एकटी दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहतील. मॉल बंद असेल.
3. कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु असतील.
4. खाद्य पदार्थ, दारू, ई-कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील.
5. माल वाहतूक सुरू असेल.
6. मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्ट बंद असतील.
7. सर्व सरकारी कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू असतील.
8. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (30 मे) राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील असे संकेत दिले होते. या संकेतानंतर नागपूर प्रशासनाने वरील निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्रhttps://t.co/ASy45pK5MY#mumbailockdown | #CoronaSecondWave | #CoronaVaccine | #Vaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
इतर बातम्या :
सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण, नागपूरमध्ये खळबळ
दिव्यांगांना लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत राहायची गरज नाही, नागपुरात स्वतंत्र लसीकरण केंद्र
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक