सुनील ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी नागपूर | 04 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भाष्य केलंय. नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही. भाजपच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावलं आहे. नवनीत राणा यांना सुद्धा संमेलनाचा निमंत्रण दिलं आहे. इथे कोणताही पक्षप्रवेश नाही सहयोगी म्हणून ते येतील. या संमेलनामधून विकसित भारताचा जो संकल्प मोदीजींनी केला आहे. त्याला आम्ही सगळे साथ देणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रातला जवळपास 60 हजार च्या वर युवक आणि विदर्भात तीस हजार असं एक लाख युवकांचे संमेलन आहे. हे नमो युवा संमेलन होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अतिव्यस्त बैठकांमुळे आज ते नमो युवा संमेलनाला येत नाही. परंतु स्मृती इराणी जी त्या आमच्या फायर ब्रँड नेत्या आहेत. नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीस तेजस्वी सूर्य हे नमो संमेलनाला उपस्थित राहणार आहे. या संमेलनामधून विकसित भारताचा जो संकल्प मोदीजींनी केला त्याला साथ देणार आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून बाहेर आलेला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे. आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आम्ही धन्य झालो, असं म्हणतात महाराष्ट्रातील या सगळ्या दौऱ्यांमध्ये 600 च्या वर कार्यकर्ते पंतप्रधानांना भेटले. ज्यांनी सगळ्या आयुष्य पक्षात दिलं ते म्हणतात की आमचं आयुष्य धन्य झाला आहे, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.
प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे, परंतु जेव्हा एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा हे बसतील आणि त्यानंतर जागांचे वाटप होईल. तेच अंतिम राहील मागणी करणे हे प्रत्येक पक्षाकडे स्वाभाविक आहे. शेवटी निवडून येणे हा महत्त्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो. निवडून येण्याकरिता काय काय बाबी करावी लागेल. त्यातून निर्णय होतील आणि मग पुढे जाईल, असं म्हणत जागा वाटपाच्या मुद्द्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.