नागपूरकरांचं टेन्शन वाढलं, 12 पोलिसांना कोरोना, पोलीस दलात खळबळ

| Updated on: Sep 12, 2021 | 1:32 PM

ट्रेनिंग आटोपून नागपुरात परत आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली असता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

नागपूरकरांचं टेन्शन वाढलं, 12 पोलिसांना कोरोना, पोलीस दलात खळबळ
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर : नागपूरमधील एमबीबीबएसचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं प्रकरण ताजं असताना 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपूर पोलीस दलाची चिंता वाढली आहे.

30 ऑगस्टला नागपूर पोलीस दलातील सर्व 31 पोलीस स्टेशन मधील गुप्त वार्ता विभागातील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी व विशेष शाखेतील 2 असे एकूण 33 पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी येथे 10 दिवसांच्या ट्रेनिंग साठी गेले होते. ट्रेनिंग आटोपून नागपुरात परत आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली असता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

एका पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं पुण्याला गेलेल्या इतर पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. पुण्याला गेलेल्या 33 पैकी 20 पोलिसांची टेस्ट करण्यात आली त्यातून आणखी काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं कोरोनाबाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे.

लस घेऊनही कोरोना

नागपूर पोलीस दलाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले आहे. सोबतच उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आज करण्यात येणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग करण्यात येणार आहे. सध्या पोलीस विभाग महापालिकेच्या मदतीने लक्ष ठेऊन आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलाही विशेष त्रास नसून कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे

एमबीबीएसच्या 16  विद्यार्थ्यांना कोरोना

नागपुरात लसीकरणानंतरंही पुन्हा पाच एमबीबीएसचे विद्यार्थी पॅाझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधीत एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची संख्या 16 वर पोहोचलीय. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्हयात 7 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरंही एमबीबीएसचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत.

गणेश विसर्जनासाठी 248 कृत्रिम तलाव

नागपूर शहरातील कुठल्याच तलावात या वर्षी गणपती बाप्पाच विसर्जन करता येणार नाही. महापालिकेने विसर्जनासाठी केली आहे खास यंत्रणा सज्ज , सगळ्या तलावांना टीन लावून बंद करण्यात आलं. कुठूनही विसर्जन करण्यासाठी जाता येणार नाही. शहराच्या तलावाच्या भागात आणि इतर भागात शहरात 248 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तर, निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश सुद्धा तयार करण्यात आले असून त्यातच विसर्जन करायचं आहे. मागील वर्षी सुद्धा अश्याच प्रकारे निर्णय घेण्यात आला होता आणि त्याचा फायदा होऊन तलावांची ऑक्सिजन पातळी वाढली होती आणि तलाव प्रदूषित सुद्धा झाले नव्हते.

इतर बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 30 हजारांच्या खाली, कोरोनाबळींतही घट

कोयना धरणाच्या सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सरकारचा मोठा निर्णय, बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

 

Nagpur Corona update 12 Police tested corona positive who went to Pune for Training