नागपूर: नागपूरमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. मेडिकलच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ पुण्याला प्रशिक्षणासाठी गेलेल्या 12 पोलिसांना कोरोना संसर्ग झाल्यानं नागपूरकरांची चिंता वाढली आहे. आता नागपूरकरांवर आणखी एक संकट आलं आहे. नागपुरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला आहे. गेल्या 9 वर्षात प्रथमचं मोठ्या प्रमाणावर डेंग्यू रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 708 रुग्ण आढळले आहेत. तर, 15 सप्टेंबरला नागपूरमध्ये डेंग्यूचे 93 रुग्ण समोर आले होते. नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग अॅलर्ट झाला असून पालिकेकडून घरांची तपासणी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देखील पालिकेकडून घरांची पाहणी करण्यात आली होती.
नागपुरात डेंग्यूचा कहर वाढत असल्याचं चित्र आहे. 9 वर्षात प्रथमच यावर्षी 708 डेंग्यूचे रु्गण आढळले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचं निदान करणाऱ्या कीटचा तुटवडा असल्याचं समोरं आलं आहे. डेंग्यू संशयितांची 3500 नमुने प्रलंबित आहेत. त्यामुळे डेंग्यूचा कहर थांबविण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर आहे.
नागपूरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. नागपुरात एका दिवसांत 93 च्या वर रुग्ण आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेनं 8484 घरांची तपासणी केली आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला 24 तासांत 303 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत.
नागूपरमध्ये कोरोना विषाणू ससंर्गाच्या रुग्णांची वाढ हळूहळू होत आहे. दुसरीकडं आता डेंग्यूनं ही डोकं वर काढलं आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिक धास्तावलेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूरमधील मेडीकल आणि मेयोमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.
नागपूर शहरात आरोग्य विभागाला 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या होत्या. त्यावेळी नागपूरकरांना कोरोना विषाणू संसर्गानंतर आता डेंग्यूला सामोरं जाव लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून शहरात डेंग्यूची भयावह स्थिती उघड झाली होती. डेंग्यूच्या आळ्या आढळलेल्या घरांवर कारवाई होणार का? हा प्रश्न याउपस्थित होतं आहे.
नागपूर महापालिकेनं 1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. नागपूर शहरात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 442 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.
नागपूरमधील एमबीबीबएसचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं प्रकरण ताजं असताना 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली होती. पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपूर पोलीस दलाची चिंता वाढली आहे. 12 जणांना कोरोना झाल्याचं समोर येताच पोलीस दल अलर्ट झालंय. आतापर्यंत 500 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. नागपूर पोलिस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.
इतर बातम्या:
नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात
महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश
Nagpur Dengue Update 708 patient found in one year after last 9 years