नागपूर : येत्या काही दिवसांत सडकी सुपारी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. पोलिसांनी ही कारवाई केली. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी येते. त्यामुळं सडकी सुपारी वितरित करण्याचे एक मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. नागपुरातून महिन्याला कोट्यवधी रुपयांची (Billions of rupees per month) सडक्या सुपारीची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. खर्रा खाणाऱ्यांची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात (In large numbers in Vidarbha) आहे. या खऱ्यासाठी ही सुपारी वापरली जाते. सडक्या सुपारीचा अवैध व्यवसाय हे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनासमोर (Food and Drug Administration) मोठे आव्हान आहे. माहिती झाल्यास हे विभाग कारवाई करतात. पण, या व्यवसायाची जळेमुळे खोदून काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे पोलीस, अन्न व औषधी प्रशासन दुर्लक्ष तर करत नाही, ना असा प्रश्न निर्माण होतो.
सडक्या सुपारीच्या तस्करीमुळं केंद्र सरकार व राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांची करचोरी होते. ही करचोरी थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या सडक्या सुपारीच्या व्यवसायाचे तार इंडोनेशिया, नायजेरिया, थायलंड आणि श्रीलंकेशी जुळलेले आहेत. बांग्लादेश मार्गे छुप्या पद्धतीने भारतात ही सुपारी आणली जाते. आसाम, मेघालय, गुवाहाटी आणि नागालॅन्ड मार्गाने नागपुरात कोट्यवधीची सडकी सुपारी येते.
सडक्या सुपारीचा वापर खऱ्यात तसेच गुटखा तयार करण्यासाठी केला जातो. खर्रा तसेच गुटखा आरोग्यास हानीकारक आहे. हे माहीत असूनही काही जण खर्रा खातात. यामुळं कॅन्सरसारखे दुर्धर आजारही होतात. खऱ्यामुळं तोंडाचा कर्करोग होता. हे सारे असूनही सडक्या सुपारीवर नियंत्रण आणण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. विदेशातील तार शोधण्यासाठी पोलिसांना आणखी किती वेळ लागेल, काही सांगता येत नाही. व्यापारी यामधून चांगले गब्बर होताना दिसून येतात. सडक्या सुपारीसाठी गोदामे भरून ठेवली जातात. त्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.